Thursday, November 21, 2024
Homeकरियरसीईटीच्या अर्जांसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ

सीईटीच्या अर्जांसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ

पुणे : विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यात येणार आहेत. या प्रवेश परीक्षांच्या नोंदणीसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार आता विद्यार्थ्यांना १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे.सीईटी सेलने या बाबतची माहिती परिपत्रकाद्वारे दिली.

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुकला, विधी, डिझाइन, हॉटेल मॅनेजमेंट अशा विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. सीईटीसाठी नोंदणीसाठी १६ ते ३० जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र काही विद्यार्थ्यांना अर्ज भरता न आल्याने ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र आतापर्यंत झालेल्या नोंदणीत अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले आहे.

तसेच अनेक पालक, विद्यार्थ्यांकडून मुदतवाढीची मागणी करण्यात आल्याने सीईटी सेलकडून मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एकूण १२ प्रवेश परीक्षांना अर्ज करण्यासाठीची मुदत १२ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली. यानंतर मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले. परीक्षांबाबतची अधिक माहिती http://www.mahacet.org या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments