आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहे. निवडणुकीच्या दृष्टीकोनातून सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अशातच काही दिवसांवर असलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काल गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यसभेच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती आहे. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी पंकजा मुंडे यांचेही नाव चर्चेत असल्याची माहिती आहे. काल रात्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी पंकजा मुंडे यांची गुप्त भेट झाली. राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणुका होणार आहे. या निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत आहे.
दरम्यान, पंकजा मुंडे या केंद्रात पक्ष संघटनेचे काम पाहत आहेत. त्यामुळे त्यांची देखील राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात ही भेट झाल्याची माहिती आहे. काल(मंगळवारी) ही भेट झालेली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून नावांची चाचपणी सुरू आहे. यादरम्यान या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यासंबधीचे वृत्त साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.