Thursday, November 21, 2024
HomeकरियरKVK Baramati recruitment 2024 : कृषी विज्ञान केंद्रात ‘दहावी पास’ उमेदवारांसाठी नोकरीची...

KVK Baramati recruitment 2024 : कृषी विज्ञान केंद्रात ‘दहावी पास’ उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!

पुणे जिल्ह्यातील बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये ‘कुशल सहाय्यक कर्मचारी’ [Skilled Supporting staff] या पदांवर भरती सुरू आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरावा लागणार आहे. अर्जाची अंतिम तारीख ११ फेब्रुवारी अशी दिलेली आहे. या पदांवर भरतीसाठी कोणते पात्रता निकष आहेत ते पाहा.

KVK Baramati recruitment 2024 : पात्रता निकष

कुशल सहाय्यक कर्मचारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांचे किमान मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले असावे. म्हणजे इयत्ता दहावीपर्यंत शिकलेली व्यक्ती या नोकरीसाठी अर्ज करू शकते.
निवड झाल्यानंतर नोकरीचे ठिकाण हे बारामती, पुणे असेल.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वय वर्षे २५ अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.
इच्छुक उमेदवारांनी ११ फेब्रुवारी २०२४ पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.

KVK Baramati recruitment 2024 – अधिकृत वेबसाईट –
https://www.kvkbaramati.com/index.aspx

KVK Baramati recruitment 2024 – अधिसूचना –
https://drive.google.com/file/d/1X9FIYoYgOLg3MwDviuEx9scwhKKmCkx9/view

अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा :

अध्यक्ष, कृषी विकास ट्रस्ट, शारदानगर, मालेगाव खुर्द, बारामती, जि. पुणे, पिन – ४१३११५, महाराष्ट्र

कुशल सहाय्यक कर्मचारी पदावर उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्यास १८,००० रुपयांचे वेतन असेल.

इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी फॉर्म हा वर दिलेल्या अधिसूचनेमध्ये मिळेल.

तसेच, उमेदवारास या नोकरीबद्दल अधिक माहिती हवी असल्यास वर दिलेल्या कृषी विज्ञान केंद्राच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी अथवा वर दिलेली अधिसूचना वाचावी.

इच्छुक उमेदवारांनी ११ फेब्रुवारी या अंतिम तारखेपर्यंत आपला अर्ज पाठवावा, याची काळजी घ्यावी.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments