हिंगोली दिनांक 18येथील श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठान हिंगोली व वंजारी समाज यांच्या वतीने कै. शिवाजीराव देशमुख सभागृहात आयोजित राष्ट्रीय नेते लोकनेते गोपीनाथराव मुंडे व्याख्यानमालेच्या उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.
या पहिल्या पुष्पाचे उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर , स्वागताध्यक्ष म्हणून कळमनुरी मतदारसंघाचे आमदार व हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा शिवसेनाप्रमुख श्री.संतोषराव बांगर कार्यक्रम चे अध्यक्ष म्हणून आमदार तान्हाजी मुटकुळे, उपस्थित होते. व्याख्याते मा. डॉ. श्री. रामकृष्ण बदने उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रकाशचंद सोनी व डॉ. श्री राम मुंढे, राजेंद्र शिखरे उपस्थित होते. या व्याख्यानमालेसाठी शहरातील तथा आसपासच्या गावातील वयाने लहान- थोर, तरुण पुरुष तथा महिला श्रोतागण मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत भगवानबाबा तसेच स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. संघर्ष कन्या व भारतीय जनता पार्टीच्या झुंजार नेत्या सन्माननीय पंकजाताई मुंडे यांनी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेला शुभेच्छा दिल्या. व्याख्यानमालेच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट करत आजच्या प्रथम पुष्पाचे *प्रास्ताविक मेजर पंढरीनाथ घुगे * यांनी केले. मान्यवरांची मनोगत होत असताना उद्घाटक श्री. जितेंद्र पापळकर साहेब यांनी स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांचा आदर्श सर्व समाज बांधवांनी घ्यावा. राजकीय विविध योजना समाजातील दुर्बल वंचित घटकासाठी आहेत यांचा प्रसार आणि प्रचार सुद्धा या प्रतिष्ठानच्या माध्यमातून व्हावा असे मनोगत व्यक्त करत व्याख्यानमालेचे उद्घाटन केले. याबाबतची विवेचन केले. स्वागताध्यक्ष श्री. संतोषरावजी बांगर यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचे मोठेपण आणि त्यांनी केलेल्या कार्याला सलाम करत असा नेता होणे नाही तसेच आपल्या कर्तुत्वाने सर्वांना आपलेसे करणारा जाणता संघर्ष पुरुष म्हणजे लोकनेते गोपीनाथराव मुंडे असे मत मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री तान्हाजी मुटकुळे साहेब यांनी माझे राजकीय जीवन घडविणारा देव माणूस म्हणजे लोकनेते गोपीनाथराव मुंडे तसेच गोपीनाथराव मुंडे यांच्या स्थानिक ते राष्ट्रीय पातळीवरील राजकीय कारकिर्दी पर्यंत प्रवास स्पष्ट करत पक्षासी एकनिष्ठ असा निष्ठावंत नेता व तळागाळातील लोकांचा आधार यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे व्याख्याते श्री. रामकृष्ण बदने यांचा परिचय डॉ सुधीर वाघ यांनी करून दिला. व्याख्यानाला सुरुवात करत असतांना व्याख्याते डॉ रामकृष्ण बदने यांनी *” आपण सर्वांनी सामाजिक विचाराचे वारस व्हावे “* या विषयात आपण, समाज व विचार या संकल्पनांची सांगड घातली. विषयानुरूप विवेचन करतांना व्यापक अर्थाने सामाजिक जीवन जगत असताना संत, महात्मे, राष्ट्रपुरुष यांच्या विचारांचा आदर्श घेऊन त्याप्रमाणे आपले आचरण निर्माण करावे यांचा बोध त्यांनी करून दिला.
सोबतच आजच्या तरुणांमध्ये हरवत चाललेली सामाजिक नीतिमूल्ये याची जाणीव करून देत समाजघटकात थोरांच्या विचारांची सामाजिक बांधिलकी निर्माण होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. स्वतः पुरता विचार न करता सर्वसमावेशक विचाराची आजच्या काळात गरज असल्याचे सांगितले. जुन्या काळातील ग्रामीण जीवनाचे विविध दाखले अतिशय विनोदी शैलीमध्ये देत त्यांनी अभंग,ओव्या , कवितेच्या माध्यमातून सर्व श्रोते यांना खेळवून ठेवले. वक्त्याच्या वक्तृत्वाला तेवढीच साथ देत उपस्थित श्रोत्यांनी आजच्या वक्त्याकडून विचारामृताचा स्वीकार केला. कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन राजकुमार मोरगे यांनी केले तर आभार एकनाथराव कुटे* यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठान सर्व कार्यकारिणी सदस्य व समाजबांधव यांनी मोलाचे सहकार्य केले.