Thursday, October 17, 2024
Homeताज्या-बातम्यापुण्यातून आणखी एक दहशतवादी ताब्यात; राष्ट्रीय तपास यंत्रणेचा सॅल्सबरी पार्क परिसरात छापा

पुण्यातून आणखी एक दहशतवादी ताब्यात; राष्ट्रीय तपास यंत्रणेचा सॅल्सबरी पार्क परिसरात छापा

पुणे : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सोमवारी सॅल्सबरी पार्क परिसरात छापा टाकला. एनआयएच्या पथकाने १९ वर्षीय तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आले आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ठाणे पुण्यासह राज्यातील वेगवेगळ्या भागात ९ डिसेंबर रोजी छापे टाकले होते. एनआयएच्या पथकाने ठाणे शहरातील पडघा आणि राज्यातील वेगवेगळ्या भागात कारवाई करून दहा संशयितांना ताब्यात घेतले होते.

तपासात मिळालेल्या माहितीनुसार एनआयएच्या पथकाने पुण्यातील सॅल्सबरी पार्क परिसरात सोमवारी कारवाई करुन एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून काही संशयास्पद कागदपत्रे, मोबाइल संच जप्त करण्यात आला. दहशतवादी विचारधारेचा प्रसार, तसेच तरुणांची माथी भडकावून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये ओढणाऱ्या आयसिसच्या महाराष्ट्र गटाकडून पुणे, मुंबईसह देशभरात बाँम्बस्फोट करण्याचा कट रचण्यात आला होता.

यापूर्वी याप्रकरणात मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान उर्फ मटका उर्फ अमीर अब्दुल हमीद खान, मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी उर्फ आदिल उर्फ आदिल सलीम खान (दोघे रा. रतलाम, मध्यप्रदेश), कादीर दस्तगीर पठाण उर्फ अब्दुल कादीर (रा. कोंढवा), समीब नासीरउद्दीन काझी (रा. कोंढवा), जुल्फीकार अली बडोदावाला उर्फ लालाभाई उर्फ सईफ, शामिल साकीब नाचन, अकिफ आतिफ नाचन (तिघे रा. पडघा, जि. पुणे ) यांना अटक करण्यात आली होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments