प्रतिनिधी: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 69 वे अमृत महोत्सवी राष्ट्रीय अधिवेशन दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.या अधिवेशनामध्ये देश आणि विदेशातील एकूण दहा हजार विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून उपस्थिती होते.या अधिवेशनाच्या दरम्यान देवगिरी प्रदेशाचे 58 वे प्रदेश अधिवेशन संपन्न झाले.या अधिवेशनाच्या दरम्यान नूतन प्रदेश कार्यकारिणी घोषित करण्यात आली.यामध्ये हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा संयोजक प्रवीणजी पांडे यांना देवगिरी प्रदेश सहमंत्री म्हणून महत्वाची जबाबदारी देण्यात आली. प्रवीणजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 2014 पासून संपर्कात आहेत.त्यांचे शिक्षण B.sc B.ED MA(समाजशास्त्र) पर्यंत पूर्ण झाले आहे.सध्या ते M.SC( रसायनशास्त्र) या विषयात पदव्युत्तर पदवी चे शिक्षण डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर येथे घेतआहेत.लहानपणा पासूनच भारत मातेबदल,समाजसेवेची जाणीव आणि समाजासाठी काहीतरी करायचे या भावनेने ते काम करत असे.पदवीचे शिक्षण घेत असताना विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात येऊन विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केले.शैक्षणिक मुद्द्याला धरून विद्यापीठात आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला. हिंगोली जिल्ह्याची जिल्हा संयोजक जबाबदारी मिळताच त्यांनी जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी परिषदेचे काम मोठ्या उत्साहाने आणि चांगल्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये वाढवले. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थी परिषदेने काढलेल्या ‘कृतज्ञता रथयात्रा’ जिल्ह्यात यशस्वी करण्यात त्यांचा खारीचा वाटा आहे. त्यांना प्रदेश सहमंत्री जबाबदारी मिळतातच जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी कार्यकर्त्यांच्या मनात आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे.या अधिवेशनाला उद्घाटक म्हणून देशाचे गृहमंत्री अमित शाह व इंडिया न्यूज टीव्ही चे मुख्य संपादक रजत शर्मा यांनी प्रा.यशवंतराव केळकर पुरस्कार वितरण केले व अन्य मान्यवर व विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रदेशाचे प्रदेश सहमंत्री म्हणून हिंगोली येथील प्रवीणजी पांडे यांची निवड
RELATED ARTICLES