Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्रविकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून गावोगावी केला जात आहे कल्याणकारी योजनांचा जागर

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून गावोगावी केला जात आहे कल्याणकारी योजनांचा जागर

हिंगोली (जिमाका), दि. 13 :  ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ आज हिंगोली तालुक्यातील कडती व हनवतखेडा, कळमनुरी तालुक्यातील निमटोक व कवडा, औंढा तालुक्यातील नागझरी व भोसी, सेनगाव तालुक्यातील केंद्रा खु. व बटवाडी , वसमत तालुक्यातील खुदनापूर येथे पोहचली आहे. शासनाच्या वतीने सर्व प्रकारच्या योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतकरी, कामगार, महिला तसेच युवा वर्गाच्या हितासाठी अनेक महत्त्वाच्या योजना शासन राबवत आहे. या संकल्प यात्रेच्या माध्यमातून गावोगावी जाऊन शासनाच्या विविध कल्याणकारी  योजनांचा जागर करण्यात येत आहे. या संकल्प यात्रेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

यावेळी या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, ओडीएफ प्लस मॉडेल ग्रामपंचायत, स्वच्छ भारत मिशन, कृषि विभागाच्या योजना, माय भारत, धरती कहे पुकार के, मेरी कहानी मेरी जुबानी आदी योजनांची माहिती देण्यात येत आहे. तसेच लाभार्थ्यांच्या यशोगाथा दाखविण्यात येत असून या योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान करणे, त्यांना लाभाचे वितरण करणे, वंचित लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे. तसेच ‘आपला संकल्प, विकसित भारत’ या एलईडी रथाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनाही सांगण्यात आल्या.

हिंगोली तालुक्यातील कडती येथील कार्यक्रमाला सरपंच सविता पोघे, उपसरपंच कल्पना जाधव, ग्रामसेवक सौ. बी. ए. गायकवाड, तलाठी प्रतिक वाजपेयी, अतुल जाधव, कृषि सहायक सौ. जंपनगीरे, अंगणवाडी ताई सरस्वती पवार, मुख्याध्यापक महाजन, कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ राजेश भालेराव, आशा वर्कर सविता जाधव यांच्यासह गावातील लाभार्थी, नागरिक उपस्थित होते. तसेच हनवतखेडा येथील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषि सहायक, नागरिक उपस्थित होते. यावेळी कडती येथील दिव्या राजेश गायकवाड यांनी बचत गटाच्या माध्यमातून मिळालेल्या लाभाबाबत माहिती दिली.

सेनगाव तालुक्यातील बटवाडी येथील कार्यक्रमाला सरपंच सौ. गंगासागर झाडे, उपसरपंच विठ्ठल मोरे, ग्रामपंचायत सदस्य इंद्रायणी झाडे, नंदाबाई झाडे, ग्रामसेवक मुळे, मंडळ अधिकारी बोडखे, तलाठी रोडगे, आरोग्य विभागाचे कर्मचारी पुंडगे, अंगणवाडी ताई, आशावर्कर व गावातील नागरिक उपस्थित होते. यावेळी लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्डाचे व आधार कार्डाचे वितरण करण्यात आले. तसेच यावेळी आरोग्य तपासणी, उज्वला गॅस योजना लाभ, किसान सन्मान, स्वनिधी योजना, जनधन योजना इत्यादी लाभ देण्यात आला.

तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील नागझरी व भोसी,  कळमनुरी तालुक्यातील निमटोक व कवडा, वसमत तालुक्यातील खुदनापूर येथे गावाचे संरपच, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments