Tuesday, October 22, 2024
Homeमराठवाडा70 वर्षीय कांबळे आजी कडून डॉ.दिलीप मस्के नाईक यांना 10 हजाराची देणगी

70 वर्षीय कांबळे आजी कडून डॉ.दिलीप मस्के नाईक यांना 10 हजाराची देणगी

बाळासाहेबांना माझा निरोप द्या,आरक्षण वाचलं पाहिजे..

हिंगोली जिल्ह्यातील लासिना येथील रत्नशिलाबाई गोविंद कांबळे,वय 70 वर्ष ह्यांना प्यारालेसिस गेली 5 वर्षापासून आहे.आजीचे शब्द ” आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ असून बाळासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणाबाबत योग्य भूमिका घेतली तसेच एक अत्यंत हुशार आणि डॉक्टर असलेले डॉ. दिलीप मस्के नाईक यांना उमेदवारी दिली.

माझं वय होत आलं आहे,माझ्याकडे जास्त वेळ नाही, माझ्यावर आंबेडकर घराण्याचे कधी न फिटणारे खूप उपकार आहेत. माझ्याकडून या घराण्यासाठी देणगी म्हणून मी माझ्या पाई-पाई जमा केलेल्या कमाईतून दहा हजाराची देणगी डॉक्टर आपणास देत आहे. बाळासाहेबांना माझा निरोप द्या की आरक्षण वाचलं पाहिजे आणि तुम्ही अशेच लढत रहावे सर्व समाज बांधव तुमच्या सोबत आहे.”हे आजीचे शब्द ऐकल्यानंतर डॉक्टर दिलीप मस्के भावूक झाले व त्यांनी आजीचे आभार मानले…!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments