हिंगोली-वृत्त: दि.10 जानेवारी 2024:- आपल्या देवगिरी प्रांताचे क्रीडामंत्री (म्हणजेच मराठवाडा व खानदेश या विभागाचे) श्रीयुत भिकन बारसे, यांनी आपल्या हिंगोली जिल्ह्याचा एकदिवसीय धावता दौरा केला. दरम्यान त्यांनी विविध क्रीडाशिक्षकांची भेट घेतली. मैदानावरही प्रत्यक्ष काही खेळाडूंच्या भेटी सुद्धा घेतल्या, आणि त्यांना मार्गदर्शन दिले व त्यांचा उत्साह वाढवला. ही टीम वाढवण्याचा संदेश त्यांनी दिला. आणि तो आपल्या सर्वांना त्यांचा तो मानस पुढे कसा राबवायचा त्याबद्दल त्यांचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान क्रीडा भारतीचा समूह; तसेच पदाधिकाऱ्यांचा समूह वाढवण्यासाठी, नवीन कार्यकर्ते सामावून घेण्याचे आवाहन त्यांनी कैले. याप्रसंगी क्रीडा भारतीचे (हिंगोली) तात्कालीन अध्यक्ष डॉक्टर संजय नाकाडे, सचिव श्री गंगावणे सर, श्री लोंढे सर, श्री हनवते, श्री आडे, श्री. मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.