कृषी प्रदर्शनी व विविध स्टॉलला भेट, पिठलं -भाकरीसह रुचकर खाद्यपदार्थांचा घेतला आस्वाद
हिंगोली :- सन 1980-85 दरम्यान हिंगोली येथील भारती विद्या मंदिर शाळेत शिक्षण घेत असताना, मी दरवर्षी हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाचा आनंद घेत होतो.आजही बालपणाची आठवण म्हणून दरवर्षी या ऐतिहासिक दसरा महोत्सवाला आवर्जून भेट देतो, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत 1855 पासून सुरू असलेल्या दसऱ्याला सर्व समाज बांधवातून मिळणारा वाढता प्रतिसाद यामुळे भारतातील म्हैसूर नंतरचा ऐतिहासिक दसरा हिंगोली येथे भरत असल्याचे बाळासाहेब ठाकरे (हरिद्रा) हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष, मंत्री हेमंत पाटील यांनी कृषी प्रदर्शनी व विविध स्टॉलला भेटी देत असताना सांगितले.
हिंगोली शहरातील प्रसिद्ध रामलीला मैदानावर दसरा महोत्सव व औद्योगिक कृषी प्रदर्शनी भरविण्यात आली आहे. यादरम्यान दसरा समितीच्या वतीने विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाते. 10 ऑक्टोबर गुरुवारी मंत्री हेमंत पाटील यांनी बालपणच्या व दरवर्षी या महोत्सवाला आवर्जून उपस्थित राहण्याच्या परंपरेला खंड पडू दिला नाही. या दरम्यान खाकी बाबा मठाचे महंत कौशल्यादास महाराज यांचे आशीर्वाद घेतले.रामलीला कथेच्या ठिकाणी उपस्थित राहून रामायणातील विविध प्रसंग दर्शन, तसेच औद्योगिक कृषी प्रदर्शनीतील शेती विषयक विविध स्टॉलला भेट देत माहिती जाणून घेतली. महिला बचत गटाच्या वतीने उभारलेल्या पिठलं भाकरी स्टॉलला भेट देत रुचकर जेवणाचा आस्वाद घेत महिला बचत गटाचे कौतुक केले. यादरम्यान दसरा प्रदर्शनीमध्ये विविध दुकानदारांना भेटी देत अडचणी सोडवत संबंधितांचे समाधान केले. तसेच मंत्री झाल्यानंतर प्रथमच हिंगोली येथे आले असता हेमंत पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह त्यांच्या चहात्यांनी सत्कार व सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
दंगल मध्ये पैलवानाची लावली कुस्ती
हिंगोली दसरा महोत्सव समितीच्या वतीने आयोजित कुस्ती दंगल स्पर्धेमध्ये हरियाणा, पंजाब यासह विविध राज्य व महाराष्ट्रातील नामवंत पैलवानांनी हजेरी लावली होती. यादरम्यान मंत्री हेमंत पाटील यांनी कुस्ती आखाडामध्ये नामवंत पैलवानांची कुस्ती लावून पारितोषिक दिली. ह्या कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी हिंगोली जिल्ह्यासह कुस्ती प्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी उपविभागीय अधिकारी तथा दसरा समितीचे अध्यक्ष समाधान घुटुकडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, सुनील देवडा, डॉ. सचिन बगडिया, राजू चापके, पांडुरंग लुंगे, रामा मुंडे, कानबाराव गरड, परमेश्वर मांडगे, भरत चौधरी, गणेश लुंगे, बंकट यादव, दिनेश चौधरी, संजू मांडगे, योगेश दुबे, गणेश साहू, अभिजीत पवार, नफीज पैलवान, पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.