हिंगोली जिल्ह्यातील गुन्हे शाखा, हिंगोली ची कार्यवाही मा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंदे विरुध्द तसेच अवैध शस्त्र बाळगना-या विरुध्द कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने पो. नी. विकास पाटील स्था. गु. शा. हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे पथक कार्यरत आहेत.दि ११/१०/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोस्टे वसमत शहर ग्रामीन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना गोपनिय माहिती मीळाली की एका इसमाने हिंगोली जिल्ह्यात पिस्टल विक्रीसाठी येत असुन तो पोस्टे वसमत ग्रामिन हद्दीत आसेगाव रोड जवळ एका स्कुटीवर थांबला आहे
अशी गोपनिय माहिती मिळाल्यावरुन पोलीस पथकाने सदर ठिकाणी रात्री छापा मारुन ताब्यात घेतले असता त्याचे नाव सुरज मधुकर पाटील वय २३ वर्ष व्यवसाय हॉटेल चालक रा रवीनगर कौठा नांदेड असे सांगीतले, पोलीसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला एक गावठी पिस्टल मिळुन आली. पोलीस पथकाने सदर पिस्टल बावत अधिक विचारपुस केली असता सदरची पिस्टल ही त्याचा मीत्र नामे पवन देवराव पुय्यड रा केरवाडी शिरपुर ता पालम जि परभणी यांने दिल्याचे सांगितल्यावरुन पोलीसांनी सदर पिस्टल जप्त करुन आरोपी सुरज मधुकर पाटील वय २३ वर्ष व्यवसाय हॉटेल चालक रा रवीनगर कौठा नांदेड व पवन देवराव पुय्यड रा केरवाडी शिरपुर ता पालम जि परभणी यांचे विरुध्द पोस्टे वसमत ग्रामिन येथे भा ह का ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही मा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मा अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, पो. नि. श्री. विकास पाटील, स्था. गु. शा. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. श्री शिवसांव घेवारे, पोलीस अंमलदार नितीन गोरे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, आजम प्यारेवाले, हरीभाउ गुंजकर, साईनाथ कंठे यांनी केली आहे.
अवैध शस्त्र बाळगना-याची गोपनिय माहीती काढुन त्यांचेविरुध्द कठोर कार्यवाही करणार असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले.