माजी राष्ट्रपती स्व. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस म्हणजे 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येते. याचेच औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभरुण आंध तांडा येथे येथील सर्व विद्यार्थ्यांनी शाळेतील ग्रंथालयात उपलब्ध असणारी विविध पुस्तके वाचून वाचन प्रेरणा दिन साजरा केला.
मराठी भाषेचा विकास, प्रचार व्हावा तसेच वाचन संस्कृती वाढीस लागावी हा या मागचा मुख्य उद्देश ठेवण्यात आला. शाळेतील शिक्षक श्री राजकुमार मोरगे यांनी वाचनाचे महत्त्व सांगत वाचन हा छंद म्हणून जोपासावा हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून या व्यतिरिक्त शनिवारी उपक्रमाचा वार या अंतर्गत अवांतर वाचनाची पुस्तके वाचली जाऊन वाचण्यास प्रेरणा दिली जाते. कार्यक्रमाचे आभार श्री पालेवार सर यांनी मानले. यावेळी अंशकालीन निदेशक श्री टेकाळे व विद्यार्थी उपस्थित होते.