हिंगोली येथे जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
हिंगोली येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर दि.७ फेब्रुवारी रोजी माता रमाई यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अध्यक्षस्थानी डॉ. माधवी घटे ह्या होत्या प्रमुख व्याख्याता म्हणून डॉ.लक्ष्मी गलांडे ह्या होत्या. कार्यक्रमास सुनिता मुळे,अरुणा आंभोरे,कांताबाई कल्याणकर, उषा इंगोले, शिल्पा भिसे, रुक्मिणीबाई पुंडगे, शारदा तांबडे, सुधा सपकाळ, माया भगत, डॉ.विकास कल्याणकर, प्रकाश इंगोले, शामराव सोळंके आदींसह मोठ्या संख्येने उपस्थितीत होती.