Thursday, November 21, 2024
Homeताज्या-बातम्याहिंगोलीत भारतरत्न नानाजी देशमुख कौशल्य विकास व उद्योजकता केंद्राचे गुरुवारी उद्घाटन होणारभाजपा...

हिंगोलीत भारतरत्न नानाजी देशमुख कौशल्य विकास व उद्योजकता केंद्राचे गुरुवारी उद्घाटन होणारभाजपा नेते डॉ. श्रीकांत पाटील यांची माहिती

हिंगोली प्रतिनिधी :- भारतरत्न नानाजी देशमुख यांची जन्मभूमी हिंगोली जिल्ह्यातील कडोळी असली तरी मध्यप्रदेशातील चित्रकूट ही त्यांची कर्मभूमी मानली जाते. नानाजीचा जन्मभूमीत त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी यासाठी राज्य सरकार कर्मभूमी ते जन्मभूमी नानाजींचा विचाराचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी भारतरत्न नानाजी देशमुख कौशल्य विकास व उद्योजकता केंद्राच्या माध्यमाने कौशल भारत, कुशल भारत,आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून विविध उपक्रम राबवत आहे. या कौशल विकास व उद्योजकता केंद्राचा शुभारंभ शहरातील नगर परिषदेच्या जुन्या जागेत उद्या दिनांक 1 फेब्रुवारी रोजी गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांच्या हस्ते यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती भाजप नेते हिंगोली लोकसभा संयोजक डॉक्टर श्रीकांत पाटील यांनी दिली.हिंगोली जिल्ह्याची ओळख ना उद्योग जिल्हा अशी आहे. जिल्ह्यात रोजगाराच्या कुठल्याही संधी नसल्यामुळे युवक रोजगाराच्या शोधात महानगराकडे धाव घेतात. यूवकांच्या हाताला काम मिळावे यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता केंद्र मार्फत विविध उपक्रम राबविले जाणार असून युवकांना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देऊन विविध कंपन्यात प्लेसमेंट देण्याचा उपक्रम या माध्यमाने राबवला जाणार आहे. याचबरोबर नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर चर्चासत्राचे आयोजन देखील शहरातील मधुर दीप पॅलेस हॉटेलच्या सभागृहात करण्यात आले आहे. यावेळी विश्वकर्मा योजनेच्या शुभारंभ होणार असून यावेळी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपनीचे सोबत एम ओ यु करार केला जाणार आहे. आयोजित प्रशिक्षण शिबिरात तीन महिन्याचे प्रशिक्षण दिले जाणार असून प्रशिक्षणार्थींची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवाराचे वय 18 ते 35 असे असावे किमान पात्रता आठवी असून प्रशिक्षणानंतर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मदत केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उमेदवारांनी उपस्थित राहावे. कार्यक्रमात आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना “स्किल कार्ड” देण्यात येईल त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण मिळेल अशी माहिती भाजप नेते श्रीकांत पाटील यांनी केले आहे. आयोजित कार्यक्रमास अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, एन एस डी सी चे चेअरमन वेदांत तिवारी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे प्रभारी कुलगुरू माधुरी देशपांडे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जि प सी ई ओ संजय दैने, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, संचालक एस जी जी एस आय ई नांदेडचे डॉ मनेश कोकरे, एन एस डी सी सीईओ वेदमनी तिवारी, सी आर आय एस पी चे संचालक अमोल वैद्य, नगर परिषदेचे प्रशासक तथा सिओ डॉ. अरविंद मुंडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments