मंत्री हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
हिंगोली – हिंदूह्रयद्यसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे देशातील पहिले हळद संशोधन केंद्र हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे सुरु झाले असून हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या यशात एक एक मानाचा तुरा रोवला जात आहे . यामध्ये आता भरीव निधीची भर पडली असून आज झालेल्या राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत 800 कोटीच्या भरीव निधीस मान्यता देण्यात आली आहे.
यामुळे खऱ्या अर्थाने मराठवाड्यात सुवर्णक्रांतीला सुरवात झाल्याची चर्चा असून मंत्री हेमंत पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले.यामुळे संशोधन केंद्राच्या कार्यास गती मिळणार आहे आणि यासोबतच हळद संशोधन केंद्रास वैधानिक दर्जा सुद्धा मिळाला आहे.
देश आणि जागतिक पातळीवरून हळदीला असलेली मागणी लक्षात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहीत करून त्याचे क्लस्टर करावे, असे निर्देश राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत दिले होते.
मराठवाडा विदर्भ सारख्या दुष्काळग्रस्त भागात हळदीच्या उत्पादनाने सुवर्णक्रांती होईल, असा विश्वास मुख्यमंत्री महोदयांनी व्यक्त करून या केंद्रास 800 कोटीचा भरीव निधी मंत्री मंडळाच्या मागील बैठकीत मंजूर केला होता. आज (दि.10 ऑक्टो ) रोजी झालेल्या बैठकीत हळद संशोधन केंद्राकरिता अतिरिक्त 800 निधीस मान्यता देण्यात आली आहे. हळदीचा वापर दैनंदिन जीवनापासून ते औषध निर्मीतीसाठी केला जातो. त्यामुळे हळदीला देश आणि जगभरातून मोठी मागणी आहे. या पिकास किड कमी प्रमाणात लागते पाण्याचा वापर कमी प्रमाणात होते. नैसर्गिक आपत्तीस तोंड देणारे हे नगदी पीक आहे.
त्यामुळे या पिकाच्या उत्पादन वाढीसाठी या संशोधन केंद्रामुळे चालना मिळणार आहे.यासंशोधन केंद्रामध्ये शेतकऱ्यांना गुणवत्ता असलेले उती संवंर्धीत (टिश्यू क्लचर) रोपांसाठी प्रयोगशाळा, हळद प्रक्रीया केंद्र, विकीरण केंद्र करण्यात येत आहे. देशभरात ५० लाख टन हळदीचा वापर होतो त्यापैकी निम्मी हळद महाराष्ट्रात उत्पादीत होते. जागतिक दर्जाचा देशातील हा एकमेव प्रकल्प आहे. या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांची हळद निर्यात केली जाईल, त्याच बरोबर बेरोजगारांना रोजगार मिळण्यास मोठी मदत होईल.