हिंगोली (जिमाका), दि. 15 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभांगाच्या वतीने हिंगोली जिल्हयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, हिंगोली येथे दिनांक 15 ऑक्टोंबर, 1932 रोजी सामाजिक न्याय विभागाची स्थापना झाली असून सामाजिक न्याय विभागाला 15 ऑक्टोंबर, 2023 रोजी 91 वर्षे पूर्ण झाल्यामुळे सामाजिक न्याय विभाग स्थापना दिवस आज मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच स्व.डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस म्हणून वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात व्याख्यान व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातून सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांचा सत्कार तसेच विविध खेळामध्ये जिल्हास्तरावर व विभागस्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमही घेण्यात आला.
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात आज सामाजिक न्याय विभाग स्थापना दिन, स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिन व अंधा करिता सहारा असणारी जागतिक पांढरी काठी दिन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाशिम येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षा डॉ.छाया कुलाल या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सचिन हाटकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके, बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी सिध्दार्थ गोवंदे, सेवा निवृत्त कनिष्ठ लिपीक मुकुंद रानबा हानवते, सेवा निवृत्त स्वयंपाकी रामा भगवानराव येळणे, सेवा निवृत्त मदतनीस केशव ग्यानोजी बरडे, आत्मारामजी वागतकर, विशाल इंगोले इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महामानव क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहु महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार-डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवजी महाराज, स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण राजू एडके यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अशोक इंगोले-समतादूत यांनी केले. क्रीडा क्षेत्रात विविध स्पर्धेमध्ये निवड झालेल्या विजा भज आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माध्यमिक आश्रमशाळा, रामेश्वरतांडा येथील अशिष अविनाश चव्हाण व प्राथमिक आश्रमशाळा, हत्ता ना. येथील सचिन गजानन चव्हाण या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.