हिंगोली येथे स्व. खा. शिवाजीराव देशमुख सभागृहात झालेल्या भव्य शिक्षक काव्य मैफिल कार्यक्रमात मा. जिल्हाधिकारी पापळकर साहेबांच्या हस्ते व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी दैने साहेब, मा. शिक्षणाधिकारी सोनटक्के साहेब व प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षकांनी बनवलेल्या हिंगोली जिल्ह्यातील ऐतिहासिक , धार्मिक ठिकाणांच्या तथा स्वातंत्र्यसैनिक यांच्या माहितीपटाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी साहेबांनी माहितीपट बनवणाऱ्या शिक्षकांना व्यासपीठावर बोलावून अभिनंदन केले. हिंगोली जिल्ह्यातील संस्कृती , इतिहास अनेक लोकांपर्यंत पोचविण्याचे कार्य हे माहितीपट करतील असे प्रतिपादन त्यांनी केले.
यामध्ये राजकुमार मोरगे, दिलीप धामणे , मनोहर पोले , दीपक कोकरे, दत्ता पडोळे, बालाजी काळे , विजय बांगर , शंकर लेकुळे, गजानन चौधरी , सुमित यन्नावार , बालाजी तारे, संतोष लोंढे, बळवंत राठोड इत्यादी शिक्षकांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त खास उपक्रमाद्वारे जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक ठिकाणांचा व स्वातंत्र्य सैनिकांचा प्रत्यक्ष जाऊन व्हिडिओ, फोटो, मुलाखती याद्वारे शोध घेतला होता.
या वेळी प्रमुख उपस्थितीमध्ये उपशिक्षणाधिकारी नेटके साहेब, उपशिक्षणाधिकारी गुंडेवार साहेब, गटशिक्षणाधिकारी नांदे साहेब , गटशिक्षणाधिकारी भोसले साहेब इतर अधिकारी मंडळी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.