मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी 5 उमेदवार जाहीर केले आहेत. राष्ट्रवादीची ही पहिली यादी असून लवकरच दुसरी यादी देखील जाहीर होईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
‘हे’ आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच उमेदवार
- वर्धा – अमर काळे
- दिंडोरी – भास्करराव भगरे
- बारामती- सुप्रिया सुळे
- शिरुर – अमोल कोल्हे
- अहमदनगर – निलेश लंके
- महाविकास आघाडातील यापूर्वी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचे उमेदवारही जाहीर झाले आहेत. यामध्ये शिवसेनेनं १७ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. तर काँग्रेस ७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामुळं मविआचे आत्तापर्यंत एकूण 29 उमेदवार जाहीर झाले आहेत.