हिंगोली येथे मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह विधानसभा मतदार संघात विविध विकास कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. तान्हाजी मुटकुळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.तसेच ही सर्व कामे मार्च अखेर पूर्ण केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.येथील भाजपा कार्यालयात शनिवार दि.४ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खा.ऍड.शिवाजी माने, माजी आ.गजानन घुगे, भाजपाचे नेते रामदास पाटील सोमठाणकर, ऍड.के.के.शिंदे आदींची उपस्थिती होती.यावेळी बोलताना आ.मुटकुळे म्हणाले, हिंगोली विधानसभा मतदारसंघात विकास कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला असून यामध्ये नव्याने १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय महाविद्यालय मंजूर झाले आहे. तसेच याला संलग्नित ४३० रुग्ण खाटाचे रुग्णालय देखील स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी २४१.७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यासह हिंगोली पंचायत समिती प्रशासकीय इमारत बांधकाम करण्यास मंजूर मिळाली असुन यासाठी ११.८८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहेतसेच २५१५ लेखा शिर्षातर्ंगत ग्रामीण भागात मुलभूत सोयीसुविधा पुरवीण्यासाठी १५ कोटी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना (दलीत वस्ती) आठ कोटी रुपये, प्रादेशीक पर्यटन विकास योजना १०५ कोटी, अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात मुलभूत, पायाभुत सुविधा उपलब्ध करण्यासाठी ७५ कोटी, अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रात मुलभूत,पायाभुत सुविधा उपलब्ध करणे यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना दोन कोटी, डोंगरी विभाग विकास कार्यक्रम योजना ४५ कोटी अर्थ संकल्प जुलै २०२३ साठी ३९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मंजुर करण्यात आलेली हि सर्व कामे मार्च अखेर पर्यंत पुर्ण केली जाणार असल्याची माहिती आ.तान्हाजी मुटकुळे यांनी दिली आहे
वैद्यकीय महाविद्यालयासह विविध विकास कामासाठी कोटयावधी रुपयांचा निधी मंजुर – आ.तान्हाजी मुटकुळे
RELATED ARTICLES