विधानसभा निवडणुक अनुषंघाने पेट्रोलींग दरम्यान एकुण एक कोटी चाळीस लाख सदोतीस हजार पाचशे रूपये) ची रोकड जप्त (स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली ची कामगीरी) श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक हिंगोली यांनी विधानसभा निवडणुक-२०२४ चे अनुषंगाने संशईतरीत्या रोख रक्कमेची वाहतुक करणा-यांना पकडुन कार्यवाही करण्याबाबत वेगवेगळे पथक नेमले असुन त्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांना सुध्दा सुचना दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध रोख रक्कम वाहतुकीवर लक्ष ठेवुन होते.दिनांक २५/१०/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनिय माहिती मिळाली की कार क. एम.एच. ३८ ए.डी. ६५०२ व इनोव्हा कार क एम.एच. २२ ए.एम. ८८ या वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असुन ती हिंगोलीतुन बाहेर जात आहे.
त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने बस स्थानक परिसरात कार क. एम. एच. ३८ ए.डी. ६५०२ चालक नामे अमीत ओमप्रकाश हेडा, वय ४३ वर्ष, व्य. व्यापार रा. मंगळवारा बाजार हिंगोली यास थांबवले. तर दुस-या पथकाने जुने नगर पालीका ऑफीस जवळ इनोव्हा कार क एम.एच. २२ ए.एम. ८८ चालक नामे गजानन माणिकराव काळे, वय ४४ वर्ष, व्यवसाय व्यापार, रा. सोडेगाव, ता. कळमनरी यांना थांबवीले. दोन्ही पथकांनी कार चालकास कार मध्ये काय आहे असे विचारले असता मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असल्याचे निदर्शनास आल्यावरून सदरील वाहने सुरक्षीततेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आणुन विधानसभा निवडणुक संदर्भाने नेमलेले एफ.एस.टि. पथकाचे नोडल अधिकारी श्री अरविंद मुंढे यांना संपर्क करून दोन एफ.एस.टि. पथक पोलीस अधिक्षक कार्यालय येथे बोलावुन घेवुन दोन्ही वाहनातील रोख रक्कमेबाबत एफ.एस.टि. पथकातील व पोलीस पथकातील अधिकारी यांनी संयुक्तरीत्या विचारपुस केली असता रोख रक्कम वाहतुकीचे कारण समाधानकारक वाटले नसल्याने पोलीस पथक व एफ.एस.टि. पथक यांनी संयुक्तरीत्या सदर वाहनातील रोख रक्कमेचा पंचनामा करून कार क. एम.एच. ३८ ए.डी. ६५०२ मधुन रू १,२६,८८,५२०/- व कार क एम.एच. २२ ए.एम. ८८ मधुन रु १३,५०,०००/- अशी एकुण १,४०,३७,५००/- रूपयाची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही . श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक हिंगोली, अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक, हिंगोली, विकास पाटील, पोलिस निरीक्षक, स्था.गु.शा. हिंगोली यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. शिवसांब घेवारे, पोउपनि. विक्रम विटूबोने, पोलीस अंमलदार प्रेमदास चव्हाण, नितीन गोरे, विशाल खंडागळे, किशोर सावंत, आझम प्यारेवाले, साईनाथ कंठे, रवि स्वामी, नरेंद्र साळवे, हरिभाऊ गुंजकर, आकाश टापरे, रमेश कुंदर्गे व एफ.एस.टि. पथक नोडल अधिकारी श्री अरविंद मुंढे, एफ.एस.टि. पथक प्रमुख जे.बी. घुगे, एफ.एस.टि. पथक प्रमुख व्हि.व्हि. चव्हाण, एस.डी. चिलकल, जी.के. इंगळे, एस.एस. गुहाडे, डी.ए. डाखोरे यांनी केली आहे.