दिनांक 28 ऑक्टोबर रोजी जि. प. प्रा. शा. राहोली खुर्द यांच्या वतीने कोजागिरीच्या निमित्ताने ” कोजागिरीचे चांदण ” या निमंत्रितांच्या कवी संमेलनाचा कार्यक्रम घेण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्री गजानन बोरकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. विद्यार्थ्यांना कवी, लेखक यांचा परिचय व्हावा तसेच कवितेची जवळून ओळख व्हावी या हेतूने शिक्षिका तथा कवयित्री सिंधुताई दहिफळे यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमांमध्ये निमंत्रित कवी म्हणून कवी राजकुमार नायक, कवी संदीप पाटील गोरेगावकर, कवी राजकुमार मोरगे, कवी कैलास कावरखे, कवी पांडुरंग गिरी, कवी विजय गुंडेकर, कवयित्री सौ. सिंधुताई दहिफळे इत्यादी कवी उपस्थित होते. या कवींनी आपापल्या विविध विषयांवर बहारदार कविता सादर केल्या. तसेच विध्यार्थ्यांना कवितेची ओळख व कविता लेखन याविषयी सखोल मार्गदर्शन ही केले.
या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच सचिन गरड, सर्व सदस्य , शा. व्य. समिती अध्यक्ष व सदस्य , शाळेतील विध्यार्थी, शिक्षक, महिला, पुरुष पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी घोंगडे सर यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
राहोली खुर्द येथील शाळेत रंगले कोजागिरी निमित्त कवि संमेलन
RELATED ARTICLES