हिंगो राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बी डी बांगर यांचा स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे शेतकरी भवन येथे भव्य सत्कार समारंभ आयोजित केला. याप्रसंगी बहुसंख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.हिंगोली महसूल अंतर्गत असणाऱ्या विविध वाड्या वंजारवाडी, ससेवाडी, राजवाडी, सिंगारवाडी, बुकनवाडी, धोतरवाडी आदि बेचिराग असल्यामुळे डिजिटल होल्डिंग संगणकृत प्रणाली मधून शेतकऱ्यांना मिळत नव्हती. डिजिटल होल्डींग विविध योजनेमध्येआवश्यक असल्यामुळे डिजिटल प्रणालीत सुधारणा करणे गरजेचे होते, परंतु ही प्रक्रिया शेतकरी बंधू यांनी अनेक वेळा विनंती करून सुध्दा यापूर्वी महसूल विभागाने पूर्ण केलेली नव्हती.याकरिता शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची व्यथा नवनियुक्त राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बी डी बांगर यांना सांगितली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्री बि. डी बांगर यांनी शासना सोबत पत्र व्यवहार करत माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच महसूल आयुक्त यांना अवगत केले .या पत्राची शासनाने दखल घेत तात्काळ कार्यवाही केली व शेतकऱ्यांच्या अडचणी दूर झाल्या मुळे हिंगोली जिल्हा महसूल अंतर्गत असणाऱ्या सर्व बेचिराग वाड्यांच्या डिजिटल होल्डिंग्स आता शेतकऱ्यांना मिळणार आहेत. डिजिटल प्रणाली मधील त्रुटी दूर करून प्रणाली विकसित झाली. या प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बि. डी बांगर यांनी पत्रव्यवहार करून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविल्याबद्दल शेतकरी बांधवच्या वतीने नागरी सत्कार आयोजित करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्तीने शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचे माझे प्रयत्न सतत राहतील, शेतकऱ्यांनी अडचणी असल्यास निश्चितपणे संपर्क करावा असे मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमासाठीकाशिनाथ बांगर सावकार, उमेश पाटील, दत्तराव बांगर, उद्धवराव जगताप, दिलीप घुगे , जयवंत बांगर,लक्ष्मण बांगर, पंकज पाटील, उद्धव बांगर,कैलास जिरवणकर, बंडू घुगे, गजानन बांगर ,योगेश बांगर, सचिन बांगर, दतराव बांगर, शुभम बांगर, विठ्ठल बांगर, दत्ता घोळवे, पंजाब बांगर ,ज्ञानेश्वर बांगर ,मनोज बांगर, गंगाधर बांगर, वैजनाथ बांगर, श्रीराम बांगर ,एडवोकेट एकनाथ बांगर, संजय बांगर ,विष्णू बांगर, ज्ञानबा कुटे गजानन बांगर, शेषराव बांगर आदी शेतकरी बांधवांनी पुढाकार घेत परिश्रम घेतले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी डी बांगर यांचा नागरी सत्कार
RELATED ARTICLES