राज्यात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. नागपुरात एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या झाल्याची घटना घडली आहे. गोळीबाराच्या घटनेने नागपूर हादरून गेलं आहे. नागपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे
नागपूरात सदर पोलीस स्टेशन हद्दीत राजनगर येथे एकाची बंदुकीच्या गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विनय पूनेकर अस मृतकाच नाव असून जुने प्रेस फोटो ग्राफर असल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी काम सोडून अनेक वर्षे झाले आहेत. दरम्यान त्यांच्या घरात घुसून काहींनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली आहे. या हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत.