Wednesday, October 30, 2024
Homeताज्या-बातम्यायेलकी येथील दिव्यांग प्रवर्गातील लाभार्थींच्या घरकुलाचे भूमीपूजन

येलकी येथील दिव्यांग प्रवर्गातील लाभार्थींच्या घरकुलाचे भूमीपूजन

हिंगोली (जिमाका), दि. 20 : कळमनुरी तालुक्यातील येलकी ग्रामपंचायत येथील दिव्यांग बांधव हे दि. 05 ऑक्टोंबर 2023 रोजी आयोजित केलेल्या दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानांतर्गत दिव्यांग मेळाव्यामध्ये उपस्थित होते. यावेळी दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडु यांच्याकडे त्यांनी दिव्यांगासाठी घरकुलाची मागणी केली. त्यांची नोंद घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने व प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांच्या सुचनेनुसार गट विकास अधिकारी प्रदीप बोंढारे यांनी ग्रामपंचायत येलकी ता. कळमनुरी येथे दि. 06 ऑक्टोबर, 2023 रोजी दिव्यांगाच्या घरी जावून गृहभेट घेतली व तेथेच घरकुलाचा प्रस्ताव तयार करुन सहाय्यक आयुक्त यांना सादर केला. त्यानुसार राजू ऐडके यांनी रमाई आवास योजने अंतर्गत तात्काळ मान्यता देऊन घरकुलास मंजुरी दिली.

त्यानुसार आज दि. 20 ऑक्टोंबर 2023 रोजी प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे व सहायक आयुक्त राजू एडके यांच्या हस्ते दिव्यांगांच्या घरकुलाचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी प्रदीप बोंढारे, विस्तार अधिकारी शारदा बेलुरे, ऑपरेटर गंगाधर शेळके, ग्रामीण अभियंता मनिषा लिंगायत, सागर पवार, सरपंच पतंगे, ग्रामसेवक नंदकिशोर घळे, लाभार्थी व गावकरी नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments