Wednesday, October 16, 2024
Homeमुंबईयुवा नेते शिवाजीराव मुटकुळे पानकनेरगाव येथील येथील रस्त्याचे व विकास कामांचे भूमिपूजन...

युवा नेते शिवाजीराव मुटकुळे पानकनेरगाव येथील येथील रस्त्याचे व विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

पानकनेरगाव येथील नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीनुसार रस्त्यांचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला पानकनेरगाव येथील रस्त्याचे भूमिपूजन युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, पदाधिकारी व इतर मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.

रस्त्याच्या बांधकामामुळे पानकनेरगाव येथील रहिवाशांच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल घडेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. अनेक वर्षे रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रहिवाशांना वाहतूक समस्यांचा सामना करावा लागत होता. हा रस्ता बनल्यानंतर परिसरातील वाहतूक सुलभ होईल आणि विकासाच्या नवीन संधींना चालना मिळेल, असा विश्वास युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमादरम्यान युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांनी पानकनेरगाव परिसराच्या विकासासाठी सरकारकडून आवश्यक त्या निधीची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, हा रस्ता केवळ वाहतुकीसाठीच नाही तर परिसराच्या एकूण विकासासाठी महत्त्वाचा घटक ठरेल.

कार्यक्रमाच्या समारोपानंतर नागरिकांनी आमदार तानाजीराव मुटकुळे व शिवाजीराव मुटकुळे यांचे आभार मानले आणि लवकरच या कामाचा शुभारंभ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी ज्येष्ठ नेते नारायणराव खेडेकर, तालुका अध्यक्ष माणिकराव लोडे, तालुकाध्यक्ष हिम्मतराव राठोड, घोगरे साहेब, शामराव देशमुख, विजय डोखळे,लक्ष्मणराव थोरात, भास्करराव देशमुख, विठ्ठल झुंगरे, प्रल्हाद देशमुख, गजानन देशमुख, सौ.छाया मरडे, पंकज पाटील, शिवलिंग देशमाने, राजेभाऊ देशमुख, बाळासाहेब देशमुख, भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते, व पानकणेरगाव गावातील गावकरी मंडळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments