हिंगोली: (प्रादेशिक)- महाराष्ट्र राज्य क्रीडा मंडळ व शारिरीक शिक्षण महासंघ, पूणे, यांची संभाजीनगर विभागीय शारिरीक शिक्षण शिक्षक संघटना कार्यकारिणी बैठक- हिंगोलीतील कार्यकारिणी नूतनीकरण व पुनर्जीवित करणे या सदरा खाली , आज दिनांक 21.01.2024 रोजी संपन्न झाली. सदरील कार्यक्रम जि.प.प्रशाला, कन्याशाळा, हिंगोली येथे संपन्न झाला. प्रसंगी मंचावर कार्यकारिणी चे बरेच स्थानिक तसेच विभागीय सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
स्व खाशाबा जाधव, ऑलिंपिक पदकप्राप्त कुस्तीपट्टू यांच्या प्रतिमेस पुष्पहारअर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी, महाराष्ट्र राज्याचे शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री शरदचंद्रजी धारूरकर सर यांनी अध्यक्ष पद भुषविले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री डॉ. संजय नाकाडे (अध्यक्ष क्रीडा भारती) व रणजीत काकडे ( परभणी), श्री विनय वंजे प्रांतीय क्रीडामंत्री (बीड), श्री मदने सर (नांदेड), श्री नितीन साळुंखे, श्री प्रमोद खरात, श्री जनार्दन हे उपस्थित होते. मा. आमदार श्रीयुत हेमंत पाटील यांनी पण धावती भेट दिली. तसेच सन्मा. आयुक्त श्री संजय काटकर यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच राज्यस्तरीय व विभागीय स्तरीय पदाधिकारी (महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षक संघटना हिंगोली) व जिल्हा पुनर्जीवन करणे यासाठी उपस्थित असलेले शारीरिक शिक्षक , प्रामुख्याने श्री रमेश गंगावणे (शारीरिक शिक्षण संघटनेचे हिंगोली जिल्हा-अध्यक्ष ), श्री शिंदे सर, श्री शिवाजी इंगोले, श्री भुमरे सर, श्री व्यवहारे, श्री सुकणे, श्री रॉयलवार, श्री नाईक , श्री सोनटक्के, श्री जवुळकर, श्री नरवाडे, श्री डूरे, श्री गेंडाफळे, श्री रवी हनवते , श्री आडे , श्री सुदर्शन वाठोरे , श्री पाईकराव हे सर्व आदरणीय शिक्षक वृंद (सर्व हिंगोली) बैठकीत आवर्जून उपस्थित होते.
श्री गंगावने सर यांनी प्रास्ताविक केले, तर श्री धारूरकर सर यांनी अध्यक्षीय समारोप केला. याप्रसंगी बोलताना त्यांनी संघटनेचा इतिहास, तसेच जुने अनुभव विशद करून , नवीन काय करता येईल व वास्तविकतेची सांगड कशी घालता येईल, याच्या विषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सदस्यांच्या उपस्थितीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. श्री शिंदे सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.