Thursday, November 21, 2024
Homeताज्या-बातम्यामराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित…जेष्ठ नागरीकांचे आरोग्य तपासणी शिबीर, तृतीयपंथी...

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित…जेष्ठ नागरीकांचे आरोग्य तपासणी शिबीर, तृतीयपंथी व्यक्तींना ओळखपत्र वाटप, जात वैधता प्रमाणपत्र वाटप व ऊसतोड कामगारांना ओळखपत्राचे वाटप कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न

हिंगोली :- (प्रतिनिधी)

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभांगाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात दिनांक 05-09-2023 रोजी सकाळी 11.00 वाजता जेष्ठ नागरीकांचे आरोग्य तपासणी शिबीर, तृतीयपंथी व्यक्तींना ओळखपत्र वाटप, जात वैधता प्रमाणपत्र वाटप व ऊसतोड कामगारांना ओळखपत्राचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. श्री. राजू एडके-सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,हिंगोली हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. जयाजी पाईकराव-अध्यक्ष,उगम संस्था,उमरा, मा.श्री.छाया पडघन-महिला अध्यक्षा,ऊसतोड कामगार संघटना, मा.श्रीमती रेखा देवकर-अध्यक्ष,लक्ष्मीबाई मागासवर्गीय संस्था, मा.श्री.विनोद खरटमोल-अध्यक्ष,हिंगोली जिल्हा तृतीयपंथी संघटना, डॉ.घट्टे मॅडम, वैद्यकिय अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय,हिंगोली, मा.श्री.पोपळाईत-जेष्ठ नागरीक, मा.श्री.आत्माराम वागतकर-अध्यक्ष, समाज कल्याण कर्मचारी संघटना, मा.श्री.विशाल इंगोले, इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महामानव क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहु महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

तद्नंतर जेष्ठ नागरीकांचा सत्कार करुन 60 जेष्ठ नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच 50-ऊसतोड महिला कामगारांना ओळखपत्र वाटप करुन त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली व 16-तृतीयपंथी यांना ओळखपत्राचे वाटप करुन त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच प्राथमिक स्वरुपात 18 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येऊन आरोग्य तपासणी करण्यात आली.

सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती सुलोचना ढोणे-गृहपाल यांनी तर सुत्रसंचलन श्री.अशोक इंगोले यांनी केले.

या प्रसंगी मान्यवरांनी ऊसतोड कामगारांच्या समस्येविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच तृतीयपंथी यांना येणारे अडी-अडचणी बाबत साक्षी रमेश पाईकराव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय समारोप कार्यक्रमात मा.श्री.राजू एडके – जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मागासवर्गीय घटकासाठी सुरु असलेल्या विविध योजनांची माहिती सांगीतली व जास्तीत जास्त पात्र मागासवर्गीय घटकातील लाभार्थ्यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

सदरील कार्यक्रमाला हिंगोली जिल्हयातील 450 ते 500 ऊसतोड कामगार, तृतीयपंथी व्यक्ती, जेष्ठ नागरीक तसेच जात वैधता प्रमाणपत्राचे लाभार्थ्यांची उपस्थिती होती.

सदर कार्यक्रमासाठी हिंगोली येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments