हिंगोली (जिमाका), दि. 15 : जिल्हा प्रशासन व समाज कल्याण विभाग हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव येथे व्यसनमुक्ती प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात व्यसनमुक्ती रॅलीने झाली. या रॅलीवेळी आमदार तानाजी मुटकुळे, सहायक आयुक्त राजू एडके, रामदास पाटील, विस्तार अधिकारी राऊत, सरपंच पठाण यांची उपस्थिती होती. त्यामध्ये जिल्हा परिषद हायस्कूल येथील विद्यार्थी, गावकरी व शाहीर इंगोले यांचे कलापथक सहभागी होते. तदनंतर संत नामदेव महाराज यांच्या मंदिरासमोर व्यसनमुक्ती प्रबोधनात्मक कार्यक्रम व पोस्टर प्रदर्शनी भरवण्यात आली. यामध्ये 10 कलापथकांनी गीत, भारुड यांच्या माध्यमातून व्यसनमुक्ती संदर्भात जागृती केली.
या कार्यक्रमास गावकरी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोरा यांनी केले तर पिंगळकर, मुंडे, राणे, कंदारकर, पांचाळ, कुंभकर्ण, मुख्याध्यापक बंडेवार गुंडेवार यांनी सहकार्य केले.