स्वयंसेवक संघाचे जिल्हा बाल संचलन
हिंगोली : येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने बाल संगम २०२४ चे आयोजन १५ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. या बाल स्वयंसेवकामध्ये १२ ते १७ वयोगटातील ७ वी ते १२ वीचे बाल स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने इयत्ता ७ वी ते १२ वीच्या बाल स्वयंसेवकांनी १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११.१५ वाजता विविध भागातून मुख्य मार्गावरून पथसंचलनला सुरूवात करण्यात आली.
यावेळी बाल स्वयंसेवकांच्या पथसंचलना वेळी अतिषबाजी व रांगोळी विविध मार्गावर काढण्यात आली. तसेच पथसंचलनावर नागरिकांनी अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी केली.यावेळी बहुविध जिल्हा परिषद मैदानावर एकत्रित येत बाल स्वयंसेवकांना मार्गदर्शन करण्यात आले. जि.प.बहुविध प्रशालेच्या मैदानावर बाल सगम संपन्न हिंगोली येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने बाल सगम पथसंचलनाचे १५ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाल स्वयंसेवक हे जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर एकत्रित येवुन स्वातंत्र्य विर सावरकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्री अष्टविनायक चौक, भारतीय विद्या मंदिर समोरील भट्ट कॉलनी, जुन्या पोलीस अधिक्षक कार्यालय, आरामशिन रस्ता, अंबिका टॉॅकीज चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा गांधी चौक, महाराणा प्रताप चौक, जुने नगर परिषद कार्यालय, पिपल्स बँक यासह विविध मार्गानी बाल स्वयंसेवकांनी पथसंचलन केले. यावेळी या बाल स्वयंसेवकांना मार्गदर्शन करत पवित्र भगवा ध्वज उंचावून मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी ३५० बाल सगम संचलनात सहभागी झाले होते.