Wednesday, October 16, 2024
Homeताज्या-बातम्याबाबुळगाव आश्रम शाळेतील कुमारी स्वाती हनवते क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

बाबुळगाव आश्रम शाळेतील कुमारी स्वाती हनवते क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

दि. 10 डिसेंबर 2023 रोजी मराठवाडा विभागीय 19 वर्षाखालील छत्रपती संभाजी नगर येथे मुलींच्या क्रिकेट स्पर्धेचा आयोजन करण्यात आले होते यानंतर शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती या निवड चाचणीमध्ये अहिल्यादेवी होळकर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय बाबुळगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली या या महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी स्वाती सुनील हनवते हिने 19 वर्षाखालील मुलींच्या शालेय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध करत हिंगोली जिल्ह्यातून राज्यस्तरीय मुलींच्या क्रिकेट मधील पहिली महिला ठरल्याबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार साहेब व क्रिडा अधिकारी आत्माराम बोथीकर साहेब यांनी तिचे कौतुक केले या यशाबद्दल संस्थेची अध्यक्ष श्री दीपकराव वडकुते साहेब व सचिव सौ कविताताई वडकुते यांनी अभिनंदन केले व सदिच्छा दिल्या यावेळी श्री पोघे सर श्री इंगोले सर श्री गजानन आडे सर श्री गेडाम सर यांनी मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments