महिला व शाळेतील विद्यार्थिनींना होणाऱ्या त्रासाची लोहा पोलिसांनी घेतली दखल.
लोहा येथील बसस्थानकाच्या खुल्या जागेमध्ये सर्वांना दिसेल अशा पद्धतीने लघुशंका करणाऱ्या 9 व्यक्ती विरोधात लोहा पोलिसांनी आज रोजी गुन्हे दाखल केले आहेत.
लोहा येथील बस स्टॅन्ड वर मोठ्या प्रमाणात वरदळ असते त्यातच गावातील लोक पण त्या ठिकाणी बसायला फिरायला नेहमीच जातात, लोहा येथील बस स्थानकामध्ये वॉशरूमची व्यवस्था केलेले असून पक्के बांधकाम केलेले आहे, तरीपण त्या वॉशरूम चा वापर न करता अनेक जण बस स्टॅन्ड मधील बस थांबतात त्याला लागूनच मोकळ्या जागेमध्ये लघुशन्का करत असतात.
लोहा बस स्टॅन्ड येथे मोठ्या प्रमाणात महिला प्रवासी शाळेतील विद्यार्थिनी ये जा करतात तसेच अनेक वेळा बस येईपर्यंत बस स्टॅन्ड मध्ये थांबून असतात. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी त्यांच्या दृष्टीस पडेल अशा पद्धतीने निर्लज्जपणे अनेक लोक बस स्टँड मधील मोकळ्या जागेमध्ये लघुशंका करतात, सदरची बाब ही अत्यन्त वाईट असून महिलांना त्रास दायक होती. तसेच त्यामुळे सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण झाला होता.
यावर लोहा पोलिसांनी कडक कारवाई करून सार्वजनिक ठिकाणी लघुशन्का करणाऱ्या 9 व्यक्तीस ताब्यात घेऊन त्यांना पोलीस स्टेशन येथे नेवून त्यांच्या वर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1949 कलम 115,117 प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत.
तर अनेकांना जागीच चोप देण्यात आला.