हिंगोली जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक हिंगोली श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्हयातील सराईत गुन्हेगार व लपुन छपुन चालणारे अवैध्द धंदे बाबत कडक भुमिका घेतली आहे. तसेच गंभीर गुन्हयातील आणि चोरी, जबरी चोरी, घरफोडी व दरोडा या गुन्हयातील आरोपींना नियीमत तपासणे व त्यांचे विरुध्द कडक प्रतिबंधक कार्यवाही सुरू केली आहे.
त्याचाच भाग म्हणुन गुन्हेगारांची तपासणी, अवैध्द धंदे विरूध्द कार्यवाही, फरार व पाहीजे तसेच न्यायालयाचे वारंट मधील आरोपी शोध अशा व्यापक हेतुने मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे यांचे मार्गदर्शनात दि.२३/१०/२०२४ रोजीचे सकाळी ०५.०० पासुन ते ०७.०० वा. पावेतो संपुर्ण जिल्हयात सर्वच पोलीस स्टेशन अंतर्गत विशेष कॉम्बींग ऑपरेशन राबविण्यात आले होते. सदर मोहीमेत मा. अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अबादास भुसारे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुरेश दळवे, पो. नि. विकास पाटील, स्था.गु.शा., पो.नि. गुट्टे, पो.नि.. नरेंद्र पाडळकर, पो.नि.पो. नि. गणेश राहीरे, पो.नि. मोहन भोसले, पो.नि. नितीन तांबे, पो.नि. कुंदन कुमार वाघमारे, पो.नि. डोंगरे, पो.नि. सानप, सपोनि. अनिल काचमांडे, सपोनि. रामनिरदोडे, सपोनि. संग्राम जाधव, सपोनि, दशरथ आडे, सपोनि. विजय रामोड तसेच स्थागुशा चे सपोनि. गजानन बोराटे, सपोनि. शिवसांब घेवारे, पोउपनि, विक्रम विठुबोने व सर्वच पोलीस स्टेशन मधील दुय्यम पोलीस अधिकारी व मोठया प्रमाणात पोलीस अंमलदार हे सहभागी झाले होते.
सदर मोहीमेत जिल्हयातील एकुण (४४) ठिकाणी जेथे जिल्हयातील तडीपार आदेश झालेले तसेच फरार
व पाहीजे असलेले आरोपी, रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार तसेच मिश्र वस्ती मध्ये तपासणी करण्यात आली. सदर मोहीमेमध्ये मा. न्यायालयाकडुन वेळोवेळी समन्स निधुनही तारखेवर न्यायालयात हजर राहत नव्हते व ज्यांचे बाबत मा. न्यायालयाकडुन अटक वॉरंट निघाले होत
अशा इसमांविरूध्द एकुण (१८) नॉन बेलेबल वॉरंट, (१७) बेलेबल वॉरंट, एकुण (४०) समंसची बजावणी करण्यात आली. भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे (०३) इसमाविरूध्द कार्यवाही करण्यात आली, अंधाराचा फायदा घेवुन चोरीचे करण्याचे उददेशाने संशयास्पदरित्या मिळुन आलेला रेकॉर्डवरील दरोडेखारे व घरफोड्या करणारा इसम नामे सुखदेव मारूती पवार, रा. खडकवाडी, ता. मानवत, जि. परभणी, ह. मु. कारखाना, वसमत यास संशईतरीत्या फिरतांना ताब्यात घेवुन त्याचेविरूध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
इसम नामे करणसिंग ठाकुरसिंग चव्हाण, रा. वसमत यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन एक लोखंडी तलवार व रेल्वेच्या बोगीतुन चोरलेले (०६) पोते साखर एकुण किंमती ९,०००/- रू ची जप्त करून सदर इसमाविरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२४ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच (०१) इसमांविरूध्द कलम १४२ महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे. जिल्हयात सर्वच पोलीस स्टेशन अंतर्गत महत्वाचे ठिकांणी नाकाबंदी करण्यात येवुन वाहनांची कसुन तपासणी करण्यात आली आहे. तसेच हिंगोली जिल्हयातील बँक/ए.टि. एम. चेक करण्यात आले आहे.