नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी अंतर्गत टेक्निशियन असिस्टंट आणि टेक्निशियन-I पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण ८० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०२३ आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव – टेक्निशियन असिस्टंट, टेक्निशियन – I
शैक्षणिक पात्रता –
- टेक्निशियन असिस्टंट : संबंधित विषयात प्रथम श्रेणी पदवी/ डिप्लोमा
- टेक्निशियन – I : ५५ टक्के गुणांसह १२ वी विज्ञान विषयासह उत्तीर्ण + संबंधित विषयात डिप्लोमा.
वयोमर्यादा –
- खुला – प्रवर्ग
- ओबीसी – ३ वर्षे सूट.
- मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.
अर्ज फी –
- खुला/ ओबीसी/ EWS – ३०० रुपये.
- मागासवर्गीय/ PwBD/ महिला – फी नाही.
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.
महत्वाच्या तारखा –
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – २६ नोव्हेंबर २०२३
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० डिसेंबर २०२३