Thursday, November 21, 2024
Homeताज्या-बातम्यानिवडणूक निरीक्षकांकडून लिंबाळा मक्ता येथील स्ट्रॉगरूमची पाहणी

निवडणूक निरीक्षकांकडून लिंबाळा मक्ता येथील स्ट्रॉगरूमची पाहणी

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम घोषित केला असून, त्यानुसार हिंगोली लोकसभा मतदारासंघासाठी 26 एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यामुळे आज निवडणूक निरीक्षक, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह निवडणूक यंत्रणेकामी असलेल्या विभाग, पथकप्रमुखांनी लिंबाळा मक्ता ‌येथील स्ट्रॉंगरुमची पाहणी केली.

यावेळी पोलीस निवडणूक निरीक्षक आर. जयंथी, खर्च निवडणूक निरीक्षक कमलदीप सिंह, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, सहायक जिल्हाधिकारी श्रीमती कावली मेघना, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, निवासी उप जिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य पी. बी. देवसरकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह निवडणूक यंत्रणेतील सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवली आहे. या व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी तीनही निवडणूक निरीक्षकांनी आज स्ट्राँग रुम, इव्हीएम साठवणूक कक्षाला भेट देऊन पाहणी केली. हिंगोली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 26 एप्रिल 2024 रोजी होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात निवडणुकीसंदर्भात चोख व्यवस्था करण्यात आली आहे. या अनुषंगाने त्यांनी येथील स्ट्राँग रुमची पाहणी करून आढावा घेतला.

निवडणूक निरीक्षक श्रीमती अर्चना यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे स्ट्राँगरूममध्ये सर्व व्यवस्था असल्याबाबत पाहणी करून खात्री केली. तसेच विद्युत शॉर्ट सर्कीटमुळे मतदानयंत्रांना हानी होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी या कक्षातील व गॅलरीतील तसेच लगतच्या इतर कक्षातील विद्युत पुरवठा बंद करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी सीसीटीव्ही यंत्रणा, अग्निरोधक यंत्रणा, डबल-लॉक सिस्टीम व परिसरातील सुरक्षा यंत्रणेची पाहणी केली. स्ट्राँगरुम म्हणून निवड केलेला परिसर सुरक्षीत करण्याचे त्यांनी सांगितले.

मतमोजणी केंद्रावर स्वच्छतेसह इतर सर्व आवश्यक सुविधेसोबतच उन्हापासून बचावासाठी शेड व पिण्याचे पाणी या दोन सुविधा प्रामुख्याने उपलब्ध ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
या लोकसभा मतदारसंघातील 82- उमरखेड, 83- किनवट, 84- हदगाव, 92- वसमत, 93- कळमनुरी आणि 94- हिंगोली या विधानसभा मतदार संघ निवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम व्हीव्हीपॅट आणि इतर साहित्य शासकीय तंत्र निकेतन, एम. आय. डी. सी. लिंबाळा मक्ता, येथील स्ट्रॉग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी आणण्यात येणार असून, या ठिकाणी 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.

मतमोजणी केद्रावरील स्ट्रॉंग रूम, मतमोजणी कक्ष, ईटीबीपीएस / टपाली मतपत्रिका मोजणी कक्ष, निवडणूक निरीक्षक यांचे कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कक्ष, टॅब्युलेशन कक्ष, मिडीया कक्ष, वाहन पार्किंग व्यवस्था तयार करणे व ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची सुरक्षा व्यवस्था इथे करण्यात येणार असल्यामुळे याकामी असलेल्या यंत्रणेने सतर्क राहण्याचे निर्देश श्रीमती अर्चना यांनी दिले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments