नायलॉन मांजा विकल तर खबरदार..! पोलिसांनी दोन कार्यवाहीत मांजा विक्रेत्यास ठोकल्या बेड्या. जसा जसा मकर संक्रांतीचा सण जवळ येतो तसे पतंग उडवणाऱ्याची संख्या सुद्धा वाढते त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येते की कोणीही नायलॉन मांजाचा वापर करू नये .नायलॉन मांजाने जीवित हानी झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत ते आरोग्यासाठी व जीविता साठी धोकादाक आहे त्यामुळे हिंगोली पोलिसांनी पूर्ण जिल्हाभर नायलॉन माझ्या विक्री संदर्भाने कार्यवाहीसाठी मोठी मोहीम उघडली असून आज रोजी हिंगोली शहर व जिल्ह्यात एकूण दोन कार्यवाही करण्यात आल्या आहेत .यानंतर सुद्धा नायलॉन मांझ्या विक्री बाबत कठोर कार्यवाही करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तरी कोणीही नायलॉन माझ्या विक्री करू नये व पतंग उडवणाऱ्यांनी नायलॉन मांजाचा वापर करू नये अन्यथा पोलीस प्रशासना तर्फे कठोर कार्यवाही करण्यात येईल.
नायलॉन मांजा विकल तर खबरदार..!
RELATED ARTICLES