Thursday, November 21, 2024
Homeमराठवाडाधावत्या एसटी बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका, स्टेअरिंगवर सोडले प्राण; प्रवाशांसह सहकाऱ्यांना अश्रू...

धावत्या एसटी बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका, स्टेअरिंगवर सोडले प्राण; प्रवाशांसह सहकाऱ्यांना अश्रू अनावर

हिंगोली : एसटी बस चालवताना बस चालकाला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याची घटना समोर आली आहे. बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील अनेक प्रवाशाने प्राण वाचले आहेत. मात्र बसचालक मारुती हनुमंत नेमाने (५४ वर्ष) यांचा दु्र्दैवी मृत्यू झालाय.

हिंगोलीच्या बसस्थानकात कर्तव्य बजावणारे मारुती नेमाने नेहमीप्रमाणे बस घेऊन निघाले होते. मात्र बस चालवत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. असह्य वेदना होत असताना देखील त्यांना परिस्थितीचं गांभीर्य ओळखत वेगवान बसचा वेग कमी केला आणि बस तात्काळ थांबवत बाजूला घेतली.

त्यानंतर काही क्षणात मारुती यांनी एसटीच्या स्टेअरिंगवरच प्राण सोडले. मारुती नेमाने यांच्या मृत्यूमुळे प्रवाशांसह बसस्थानकातील सहकाऱ्यांना देखील अश्रू अनावर झाले होते. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments