हिंगोली (प्रतिनिधी): धार्मिक अंधश्रद्धेमध्ये मातंग समाज फार जखडून गेला आहे. यातून बाहेर पडल्याशिवाय समाजाची प्रगती होऊ शकत नाही. यासाठी सर्वांनी अंधश्रद्धेमध्ये गुरफुटून न राहता आपल्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे तरच आपली प्रगती होऊ शकते असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक प्रा. डाॅ. संभाजी बिरांजे यांनी केले.हिंगाेली येथील कैं. शिवाजीराव देशमुख सभागृहामध्ये क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी महासंघाच्या वतीने 27 ते 29 जानेवारी दरम्यान साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व्याख्यानमालेचे आयाेजन करण्यात आले आहे. रविवारी व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प गुफंण्यात आले. दुसऱ्या पुष्पाचे उद्घाटक म्हणून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे नातू तथा मानवहित लाेकशाही पार्टीचे संस्थापक अध्यक्ष सचिन साठे उपस्थित हाेते. तर अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त न्यायाधीश पांडुरंग खिल्लारे हे होते. ‘मातंग समाजाच्या प्रगतीतील अडथळे, कारणे आणि उपाय या विषयावर बोलत असताना प्रा.डाॅ बिरांजे म्हणाले की मातंग समाजातील लोक आजही धार्मिक अंधश्रद्धेतून बाहेर पडलेले नाहीत. धार्मिक अंधश्रद्धेमध्ये गुरफटल्या गेल्यामुळेच आज समाजाची स्थिती बिकट झाली आहे .मुलांच्या शिक्षणावर खर्च करण्या पेक्षा समाजातील लोक धार्मिक अंधश्रद्धेच्या कार्यक्रमावर पैसा खर्च करत आहेत यातून काहीच साध्य होत नाही. इतर समाजाने ज्या पद्धतीने आपली प्रगती केली आहे त्यांचे अनुकरण, प्रेरणा घेऊन आपणही अापली प्रगती करणयासाठी काम केले पाहिजे. आपली भावी पिढी सुशिक्षित, सुसंस्कृत बनवण्यासाठी समाजातील प्रत्येकाने विशेष लक्ष देऊन आपल्या मुलाना शिक्षण दिले पाहििजे. बिरांजे पुढे म्हणाले की भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपण आज उंच मानाने जीवन जगत आहोत .बाबासाहेबांचे विचार घेऊन ज्यांनी उच्च शिक्षण घेतले आणि आपल्यामध्ये बदल केला तेच आज पुढे जात आहेत आपले प्रगती करत आहेत. ज्याने बाबासाहेबांचे विचार फक्त ऐकले आणि सोडून दिले ते मात्र आहे ते मात्र जिथे आहेते तिथेच आहेत. साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनीही बाबासाहेबांचे विचार प्रेरणा घेऊन मातंग समाज प्रगतीसाठी काम केले. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे एकही दिवस शाळेत गेले नाहीं तरीही अण्णाभाउ साठे नेसाहित्य क्षेत्रामध्ये मोठे योगदान दिले. त्या काळातील समाज जीवन त्यांनी आपल्या साहित्यामधून रेखाटले आहे. बिरांजे पुढे म्हणतात की गेल्या 50 ते 60 वर्षापासून मातंग समाजाची परिस्थिती थोडेही बदलली नाही. आपल्यात समाजातील लोक आपणाला फसवत आहेत. राजकारणी ही आपणाला फसवत आहेत. निवडणुका जवळ आल्या की आपला उपयोग करून घेतात आणि नंतर मात्र कोणीच विचारत नाही याकडेही समाजातील प्रत्येकाने लक्ष देण्याची गरज आहे. समाज जोपर्यंत संघटित होत नाही तोपर्यंत विकास होऊ शकत नाही यासाठी समाजाचे संघटन व्हायला पाहिजे.उद्घाटनीय भाषणात सचिन साठे म्हणाले की देशाला आज स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे उलटले तरी समाजावर होणारे अन्याय अजूनही थांबले नाही. समाज आणि समाजातील लोक एकत्र नसल्यामुळेच आज समाजावर अन्याय होत आहे. याकडे समाजातील लोकांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. साठे पुढे म्हणाले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे सर्वच साहित्य माणसांनी वाचले पाहिजे मातंग समाजातील लोकांनी अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य वाचले नसल्यामुळे अण्णा भाऊंचे विचार आणि काम हे अजूनही अनेकानां नीट समजले नाही ही शोकांतिका आहे. माणूस म्हणून माणसे एकत्र आली तरच एक मोठी समाज शक्ती तयार होते. आज माणसे माणसाजवळ एकत्र येत नसल्यामुळेच इतर जातींची लोक आजही मातंग समाजावर अन्याय अत्याचार करत आहेत. अन्याय अत्याचार नीट निमूटपणे सहन करत असल्याने येणाऱ्या काळात हा मातंग समाजासाठी खूप मोठा धोका आहे. मातंग समाजातील लोक विविध झेंडे आणि झेंड्याच्या रंगावरून गुरफटून गेले आहेत. झेंडा आणि झेंडा च्या रंगावरून आज एकमेकांचे डोके फोडण्यापर्यंत पोहोचत आहेत.साठे म्हणाले की समाजाला संघटित होण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही समाजाची ताकद दाखवण्यासाठी सर्वांनी विचार करून एकत्र आले पाहिजे.कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात सेवानिवृत्त न्यायाधीश पांडुरंग खिल्लारे म्हणाले की जातीतून विषमता निर्माण झाली आहे. ही विषमता आजही मोठ्या प्रमाणात चालत आहे समाजाने आणि समाजातील लोकांनी डावपेच ओळखायला शिकले पाहिजे डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांच्या नाय हक्कासाठी चवदार चे सत्याग्रह, नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश आदि आंदोलन करून येथील माणसांना माणूस म्हणून आणि त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले .बाबासाहेबांचे विचार घेऊन आज समाजातील लोकांनी आपले भविष्य सुधारले पाहिजे . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल खंदारे आणि आभार प्रदर्शन आत्माराम गायकवाड यांनी मानले .कार्यक्रम सशस्वी बनविण्यासाठी लहुजी साळवे कर्मचारी महासंघाचे सर्वच पदाधिकारी, सदस्य व समाजातील नागरिकांनी परिश्रम घेतले.
धार्मिक अंधश्रद्धेच्या जखड्यातून बाहेर पडल्या शिवाय समाजाची प्रगती नाही-प्रा.डाॅ. संभाजी बिरांजे
RELATED ARTICLES