Wednesday, October 16, 2024
Homeदेश-विदेशदलित विद्यार्थ्यांना सांडपाण्याची टाकी स्वच्छ करायला लावल्याचा आरोप, शिक्षक आणि मुख्याध्यापक अटकेत

दलित विद्यार्थ्यांना सांडपाण्याची टाकी स्वच्छ करायला लावल्याचा आरोप, शिक्षक आणि मुख्याध्यापक अटकेत

दलित विद्यार्थ्यांकडून सांडपाण्याची टाकी साफ करुन घेतल्याच्या आरोपावरुन मुख्याध्यापक आणि दोन शिक्षक यांना निलंबित करण्यात आलं आहे. तसंच चार कंत्राटी शिक्षकांना यासाठी नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं आहे. दलित मुलांना सांडपाण्याच्या टाकीत उतरुन ती स्वच्छ करायला लावल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. कर्नाटकमधल्या मोरारजी देसाई निवासी शाळेत ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नेमकी काय घडली घटना?

सदर घटना कोलार या ठिकाणी असलेल्या मोरारजी देसाई निवासी शाळेत घडली आहे. या शाळेत ६ वी ते १० वी या इयत्तांचे एकूण २४३ विद्यार्थी शिकतात. या शाळेतल्या पाच दलित विद्यार्थ्यांना सांडपाण्याची टाकी स्वच्छ करायला लावली असा आरोप मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर आहे. या सगळ्यांना हाताने टाकी साफ करायला लावली जो कायद्याने गु्न्हादेखील आहे.

शिक्षक आणि मुख्याध्यापक अटकेत

या प्रकरणात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरांमय्या यांनी लक्ष घातल्यानंतर मुख्याध्यापक भरतम्मा आणि टीचर मुनियप्पा यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकारे मुलांना शिक्षा दिल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. तसंच आणखी एका व्हिडीओत विद्यार्थ्यांना बॅग हातात उंचावून चालण्याची शिक्षाही दिली गेली आहे. या दरम्यान एका विद्यार्थ्याला चक्कर आली आहे. हा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. एनडीटीव्हीने याविषयीचं वृत्त दिलं आहे.

दलित मुलांनी हा प्रकार त्यांच्या घरी सांगितला. ज्यानंतर हा प्रकार काही दलित संघटनांनाही समजला. त्यांनी मोरारजी देसाई निवासी शाळेबाहेर धरणे आंदोलन करत मुख्याध्यापक आणि शिक्षकांना अटक करण्याची मागणी केली. ज्यानंतर या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. दलित मुलांना सांडपाण्याची टाकी का स्वच्छ करायला लावली? या प्रकरणी या दोघांचीही चौकशी सुरु करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments