Thursday, November 21, 2024
Homeताज्या-बातम्याठाकरे गटाचा भाजपला मोठा धक्का! बडा नेता करणार पक्ष प्रवेश? संजय राऊत...

ठाकरे गटाचा भाजपला मोठा धक्का! बडा नेता करणार पक्ष प्रवेश? संजय राऊत अन् उध्दव ठाकरेंची घेतली भेट

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे, उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते आणि खासदार उन्मेष पाटील नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे ते शिवसेना ठाकरे गटाच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरू आहे. उन्मेष पाटील आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीसाठी दाखल झाले. संजय राऊत यांच्याशी उन्मेष पाटील यांनी प्राथमिक चर्चा केली आहे. या चर्चेनंतर उन्मेष पाटील मातोश्रीवर दाखल झाले. त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती आहे.

जळगावमधून तिकीट नाकारल्यानं उन्मेष पाटील भाजपवर नाराज असून लवकरच ठाकरे गटात सपत्नीक प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. जळगावमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

जळगावमध्ये उन्मेष पाटील यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, भाजपने ऐनवेळी धक्कातंत्राचा वापर करत स्मिता वाघ यांना उमेदवार म्हणून जाहीर केले. त्यामुळे उन्मेष पाटील नाराज असल्याची आणि ते ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांनी आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि उध्दव ठाकरे यांची भेट घेतली.

त्यानंतर बोलताना भेटीनंतर बोलताना संजय राऊत म्हणाले की, उन्मेष पाटील हे जळगावचे भाजपचे विद्यमान खासदार आहेत. त्यांचं काम चांगले आहे. ते अनेक सहकार चळवळींशी ते जोडलेले आहेत. त्यांची प्रतिमा चांगली आहे. तरीही त्यांची उमेदवारी कापली आहे त्यांचं आम्हाला आश्चर्य वाटलं, ते अस्वस्थ आहेत.

पुढे राऊत म्हणाले, ते आज आम्हाला भेटले. आम्ही चर्चा केली. मातोश्रीवर आम्ही गेलो होतो. त्यांनी उध्दव ठाकरेंशी देखील चर्चा केली. ते पक्षात येण्याबाबत उद्यापर्यंत कळेल. तर उन्मेष पाटील आणि त्यांचे सहकारी ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या विचारात आहेत, असंही ते पुढे म्हणाले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments