जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी-मा.आ.भाऊराव पाटील गोरेगावकर अतिवृष्टीमुळे पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची केली
मागणी जिल्हाभरात वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी झाली असून यामुळे याचा सर्वात मोठा फटका पिकांना बसला आहे हजारो इतर क्षेत्रावरील सोयाबीन तूर हळद कापूस उडीद मूग पिकांसह पशुधनासह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या संदर्भात माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांनी हिंगोली जिल्हा दौरा करून सदरील नुकसानग्रस्त भागाची बांधावर जाऊन पाहणी केली.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहतो शेतकऱ्यांना सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून यासंदर्भातील निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले यावेळी सेनगाव तालुका अध्यक्ष भास्करराव बेंगाळ,हिंगोली तालुका अध्यक्ष बाबुराव पाटील वडदकरशेख नईम शेख लाल,,जिल्हाध्यक्ष नामदेवराव पवार, एकनाथ शिंदे जिल्हाध्यक्ष सहकार सेल,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष साद अहमद, मदन शेळके,आकाश जगताप,उत्तर भारतीय जिल्हाध्यक्ष अमर शुल्का, शेख नूमान शेख नईम , हिंगोली विधानसभा अध्यक्ष संतोष जगताप,वसंतराव तायडे,अॅड उल्हास पाटील,जहीर खान पठाण, रंगनाथ घोंगडे,गजानन गोरेगावकर,फुलाजी शिंदे,यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते