हिंगोली (जिमाका), दि. 24 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघात एकूण 1015 मतदान केंद्रावरील मूलभूत सुविधांसंदर्भात मतदान केंद्राची जिल्हा प्रशासनाकडून तपासणी करण्यात आली. या सर्व केंद्रावर दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक यांना मतदान करण्यास कोणतीही बाधा येऊ नये. तसेच त्यांचे मतदान सुलभ व्हावे, यासाठी किमान सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामध्ये व्हीलचेअर, रॅम्प, पिण्याचे पाणी, बसण्यासाठी खुर्ची, बाकडे, सुलभ शौचालय, वेटिंग शेड, बोधचिन्ह, अंध मतदारांसाठी ब्रेल व इतर सुविधाचा समावेश आहे. त्यानुषंगाने प्रशासनाच्या वतीने तपासणी करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी सुविधांचा अभाव आहे तेथे तलाठी, ग्रामसेवक, शाळा मुख्याध्यापक यांनी आवश्यक ती कार्यवाही करणेबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी निर्देश दिले आहेत.
जिल्हा प्रशासनाकडून मूलभूत सुविधा संदर्भात मतदान केंद्राची तपासणी
RELATED ARTICLES