Wednesday, October 16, 2024
Homeताज्या-बातम्याजपान एअरलाइन्सच्या विमानाला धावपट्टीवर भीषण आग, 350 जणांना सुखरूप काढले बाहेर

जपान एअरलाइन्सच्या विमानाला धावपट्टीवर भीषण आग, 350 जणांना सुखरूप काढले बाहेर

टोकियो: टोकियोच्या हानेदा विमानतळावर जपान एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. स्थानिक मीडियाने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये जपान एअरलाइन्सचे विमान हानेडा विमानतळाच्या धावपट्टीवर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे दिसून आले. या घटनेमुळे खळबळ माजली आहे. विमानातील 350 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

विमान आणि जपान तटरक्षक दलाच्या विमानात झालेल्या टक्करमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. टोकियो अग्निशमन विभागाने ही माहिती दिली. वाहतूक आणि पर्यटन मंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे सांगितले.

विमानाला आग लागली तेव्हा विमानात 350 लोक होते. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानातील सर्व लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. अशा परिस्थितीत मोठी दुर्घटना टळली. सध्या विमानाला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments