हिंगोली—कळमनुरी विधानसभा मतदार संघात विकास कामांसाठी २९९ कोटी रुपयांची निधी मंजूर झाला आहे. आमदार संतोष बांगर यांच्या पाठपुराव्याने रस्त्याची कामे मार्गी लागणार असून दुर्गम भाागतील गावकऱ्यांची वाहतुकीची सोय होणार आहे.कळमनुरी विधानसभा मतदार संघात बहुतांश गावे आदिवासी बहुल आहेत. अनेक ठिकाणी रस्ते व पुलाचा प्रश्न गंभीर असून वाहतुकीस अडचण निर्माण होत होती. त्यामुळे या भागात रस्त्यांची कामे करून नागरीकांचा वाहतुकीचा प्रश्न सोडवावा अशी मागणी गावकऱ्यांतून केली जात होती. त्यानुसार आमदार बांगर यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरु केला होता.त्यानुसार शासनाने पुरवणी मागणीमध्ये २९९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये कळमनुरी तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्गक्रमांक ७ पासून धानोरा, ढोलक्याचीवाडी, वाकोडी, बाभळी-बेलमंडळ ते येहळेगाव तुकाराम असा २९ किलो मिटर अंतराचा रस्ता तयार केला जाणार आहे. त्यासाठी २३२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या शिवाय नाबार्डमधून २ पुलांच्या बांधकामासाठी ४ कोटी ६० लाख रुपये, सार्वजनीक बांधकाम विभागामार्फत ९ रस्ते व ५ पुलांच्या बांधकामासाठी ४० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.या शिवाय आदिवासी रस्ते योजनेमध्ये जामगव्हाण येथील आदिवासी आश्रमशाळेचे आदर्श शाळेत रुपांतरीत करण्यासाठी ६ कोटी रुपये, तर १६ कोटी ५० लाख रुपयांतून १० रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली आहे. या कामांमुळे कळमनुरी विधानसभा मतदार संघात रस्त्याचे जाळे विणले जाणार असून त्यामुळे नागरीकांची वाहतुकीची सोय होणार आहे.
कळमनुरी विधानसभा मतदार संघात विकास कामांसाठी २९९ कोटी रुपयांची निधी मंजूर, आमदार संतोष बांगर यांच्या पाठपुराव्याने रस्त्याची कामे मार्गी लागणार
RELATED ARTICLES