आ. संतोष बांगर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मौजे सुकळी वळण येथील अनेक मान्यवरांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश…
हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत सुकळी वळण येथे संत सेवालाल महाराज सप्ताह मोठ्या भक्ती भावात संपन्न झाला.
यावेळी मौजे सुकळी वळण येथील रोहिदास पवार,सुभाष राठोड,राजाराम राठोड,हेमराज राठोड,विनोद राठोड,प्रल्हाद चव्हाण,उमेश पवार,प्रकाश पवार,मनोज राठोड,कृष्णा राठोड,उत्तम राठोड,पंजाब राठोड,सुधाकर राठोड,ज्ञानेश्वर राठोड,रमेश पवार व इतर अनेक मान्यवरांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी बोलताना आमदार संतोष बांगर साहेब म्हणाले की मी तुमचा सेवक असून 24 तास तुमच्या अडीअडचणीत तुमच्या मदतीसाठी तत्पर राहील.तसेच मौजे सुकळी वळण गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे असा शब्द देखील यावेळी आमदार संतोष बांगर साहेब यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिला .यावेळी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.