वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात नांदेड,परभणी, औरंगाबाद, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. नांदेडच्या लोकसभा मतदारसंघासाठी एड. अविनाश भोसीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकावर वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र अध्यक्ष रेखा ठाकूर यांची स्वाक्षरी आहे.
वंचित बहुजन आघाडीने नांदेड लोकसभा मतदारसंघासह राज्यातील 5 वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघासाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघांत ऍड. अविनाश भोसीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अविनाश भोसीकर हे लिंगायत समाजाचे प्रतिनिधी आहेत. परभणी येथे बाबासाहेब भुजंगराव उगले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.उगले हे मराठा समाजाचे प्रतिनिधी आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात अफसर खान यांना उमेदवारी दिली आहे.ते मुस्लिम समाजाचे आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघातून वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार बनवले आहे. तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बागुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मंगलदास बागुल आणि वसंत मोरे हे मराठा समाजाचे प्रतिनिधी आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे रायकिय पक्षांसोबत समीकरण बिघडल्यानंतर त्यांनी आपले उमेदवार तयार केले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने शरद पवार यांच्या गटातील उमेदवाराला आपला पाठिंबा दिला आहे.