Friday, December 6, 2024
Homeताज्या-बातम्या'५ राज्यांमध्ये भाजपला यश पण, हिंमत असेल तर…', उद्धव ठाकरेंचं भाजपला थेट...

‘५ राज्यांमध्ये भाजपला यश पण, हिंमत असेल तर…’, उद्धव ठाकरेंचं भाजपला थेट आव्हान

आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना सरकारने हिंमत असेल तर मुंबई महापालिकेची निवडणूक घेऊन दाखवावी. मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहू नका, असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलं आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पाच राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये भाजपला भरघोस यश मिळालं, मात्र त्यांना माझं आव्हान आहे, मुंबई महापालिकेची निवडणूक घेऊन दाखवावी.

पाच राज्यांचा निकाल लागला, या निवडणुकीत भाजपाला (BJP) घवघवीत यश मिळाले. आता पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या, दम असेल तर पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घ्या आणि एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलं आहे.

त्याचबरोबर सरकारला आणि अदानीला जाब विचारण्यासाठी 16 डिसेंबरला धारावीहून अदानींच्या कार्यालायवर शिवसेनेचा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना दिली आहे.

तर पुढे बोलताना त्यांनी सरकारसह गौतम अदानींवरही हल्लाबोल केला आहे. धारावीमध्ये राहणाऱ्या लोकांचे त्यांच्या उद्योगासाठी तिथेच स्थानांतर होणे गरजेचे आहे. त्यांना 400 ते 500 फुटांची जागा मिळायला हवी. 80 ते 90 हजार झोपड्या अद्याप पात्र अपात्रतेच्या सीमेवर आहे.

अदाणी यांना मला विचारायचं आहे की, तुम्ही काय करणार आहात? सरकार उद्योगपतीला मदत करत आहेत. पिढ्यान् पिढ्या धारावीवासिय राहत आहेत, त्या ठिकाणी धारावी वासियांना राहायला घर मिळायला हवं असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

आताच्या सरकारने खास सवलती अदानींना दिल्या आहेत. अदानी यांचं भल कसं होईल असा सरकारने प्लॅन केला आहे. जर टीडीआर हा विषय समोर येणार असेल तर सरकारने ते आपल्या ताब्यांत घ्यायला हवं. कुठेही सर्व्हे करताना दडपशाही झाली तर शिवसैनिक हे हाणून पाडेल. 20 टक्के सरकार आणि 80 टक्के अदानी असा विषय सध्या झाला आहे. याबाबत देखील खुलासा व्हायला हवा असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments