Friday, December 6, 2024
Homeताज्या-बातम्या१ डिसेंबरपासून बदलणार सिमकार्ड खरेदीचे नियम

१ डिसेंबरपासून बदलणार सिमकार्ड खरेदीचे नियम

 १ डिसेंबर २०२३ पासून देशात अनेक बदल होणार आहेत. त्या संदर्भातीलच एक मोठा बदल सिमकार्डच्या बाबतीत होणार आहे. केंद्र सरकार १ डिसेंबरपासून सिमकार्ड खरेदीचे नियम बदलणार आहे.

हे नियम पूर्वी १ ऑक्टोबर २०२३ पासून लागू करण्यात येणार होते. मात्र, सरकारने आता हे नियम देशात लागू करण्याचा निर्णय १ डिसेंबरपासून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

जर तुम्ही सिमकार्ड डीलर असाल किंवा सिम कार्ड खरेदी करण्याचा विचार करणार असाल तर तुम्हाला या नियमांची संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. सिम कार्ड संदर्भातील हे नवीन नियम तुम्हाला माहित नसतील तर तुम्ही अडचणीत येण्याची शक्यता आहे.

ऑगस्ट २०२३ मध्ये जारी करण्यात आली होती नवी गाईडलाईन

या वर्षातील ऑगस्ट महिन्यामध्ये केंद्र सरकारने सिमकार्ड संदर्भात एक नवी गाईडलाईन जारी केली होती. ही गाईडलाईन आता १ डिसेंबरपासून देशात लागू केली जाणार आहे.

ही नवी मार्गदर्शक तत्वे जारी करताना सरकारने असे म्हटले होते की, गेल्या ८ महिन्यांमध्ये देशातील ५२ लाख मोबाईल कनेक्शन बंद करण्यात आली आहेत. जवळपास ६७ हजार सिम कार्ड डीलर्सना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.

यासोबतच बनावट सिमकार्ड टोळीत सहभागी असलेली सुमारे ६६ हजार व्हॉट्सअ‍ॅप खातीही बंद करण्यात आली आहेत, अशी माहिती सरकारने त्यावेळी दिली होती.

सिम डीलरचे होणार व्हेरिफिकेशन

सरकारच्या या नव्या नियमानुसार सिमकार्डची विक्री करणाऱ्या सर्व डीलर्सला आता पोलीस पडताळणी करावी लागणार आहे. ही पोलिस पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे.

जर एखाद्या सिम कार्ड डीलरने पोलिस पडताळणी केली नाही आणि मोठ्या प्रमाणात सिमकार्ड्सची विक्री केली तर त्याला १० लाखांचा दंड होऊ शकतो.

त्यासोबतच, त्या व्यक्तीला तुरूंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते. त्यामुळे, सर्व सिमकार्ड डीलर्सना अनिवार्यपणे रेजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.

डुप्लिकेट सीमकार्डसाठी आधार आवश्यक

जर एखादी व्यक्ती काही कारणांमुळे त्याच्या उपस्थित मोबाईल नंबरसाठी नवीन सिमकार्ड खरेदी करणार असेल तर, तुम्हाला पुन्हा आधार कार्ड आणि पत्त्याचा पुरावा (अ‍ॅड्रेस प्रूफ) द्यावा लागणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments