Friday, December 6, 2024
Homeताज्या-बातम्या१५-हिंगोली लोकसभा मतदारसंघात ३३ उमेदवार रिंगणात

१५-हिंगोली लोकसभा मतदारसंघात ३३ उमेदवार रिंगणात

१५ अपक्ष उमेदवारांची निवडणुकीतून माघार

१५-हिंगोली लोकसभा मतदार संघात एकूण ४८ उमेदवारांपैकी आज १५ अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता ३३ उमेदवार निवडणूक रिंगणात राहणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे उपस्थित होते.

निवडणूक रिंगणात असलेले उमदेवार

आष्टीकर पाटील नागेश बापुराव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), गजानन धोंडबा डाळ (बहुजन समाज पार्टी), विजय रामजी गाभणे (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्ससिस्ट), संभाराव उर्फ बाबुराव गुणाजी कदम (शिवसेना), अनिल मोहिते (अखिल भारतीय परिवार पार्टी), अलताफ अहेमद (इंडियन नॅशनल लीग), श्रीमती त्रिशला कांबळे (बहुजन समाज पार्टी- आंबेडकर), श्रीमती देवसरकर वर्षा शिवाजी, (बहुजन मुक्ती पार्टी), देशा श्याम बंजारा (समनक जनता पार्टी), प्रकाश मेशराम रणवीर (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – ए), बाबू धनू चव्हाण (वंचित बहुजन आघाडी), रवी रमादास जाधव (अभिनव भारत जनसेवा पक्ष), सुनिल दशरथ इंगोले (भीमसेना), हेमंत राधाकिशन कनाके (राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी), अशोक पांडुरंग राठोड (अपक्ष), आनंद राजाराम धुळे (अपक्ष), अंबादास सुकाजी गाडे (अपक्ष), अ. कदिर मस्तान सय्यद (गोरेगावकर) (अपक्ष), गोविंदराव फुलाजी भवर (अपक्ष), दत्ता श्रीकृष्ण सूर्यवंशी (अपक्ष), देवजी गंगाराम आसोले (अपक्ष), बाबुराव आनंदराव कदम (अपक्ष), महेश कैलास नप्ते (अपक्ष), रवी यशवंतराव शिंदे (अपक्ष), रामप्रसाद नारायण बांगर (अपक्ष), रामराव आत्माराम जुंबडे (अपक्ष), वसंत किसन पाईकराव (अपक्ष), ॲड. विजय ज्ञानबा राऊत (अपक्ष), विश्वनाथ भाऊराव फाळेगावकर (अपक्ष),
शिवाजी मुंजाजीराव जाधव (अपक्ष), सर्जेराव निवृत्ती खंदारे (अपक्ष), सुनील मोतीराम गजभार (अपक्ष) आणि सत्तार पठाण (अपक्ष) अशी निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांची नावे आहेत.

अर्ज मागे घेणारे १५ अपक्ष उमेदवार

हिंगोली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १५ अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.

अशोक संभाजी ढोले, अशोक वामन पाईकराव, प्रा. डॉ. अश्विन कुमार पुरभाजी क्षीरसागर पाटील कोहळीकर ऊर्फ प्रा. के. सागर, गोविंद पांडुरंग वाव्हळ, गंगाधर रामराव सावते, दिवाकर माणिकराव माने, धनेश्वर गुरु आनंद भारती, नागोराव पुंजाराव ढोले, नामदेव ग्यानोजी कल्याणकर, बाजीराव बाबुराव सवंडकर, मनोज आनंदराव देशमुख, राजू शेषेराव वानखेडे, रामदास शिवराज पाटील, विवेक भैय्यासाहेब देशमुख आणि संजय श्रावण राठोड हे उमेदवारी अर्ज मागे घेतलेले उमेदवार आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments