Friday, December 6, 2024
Homeहोमहिंगोली शहर मधील चिखलवाडी व गंगा नगर परिसरात जोरदार प्रचार दौरा संपन्न

हिंगोली शहर मधील चिखलवाडी व गंगा नगर परिसरात जोरदार प्रचार दौरा संपन्न

हिंगोली शहर मधील चिखलवाडी व गंगा नगर परिसरात जोरदार प्रचार दौरा संपन्न झाला. या मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत नागरिकांनी बंधू-भगिनींनी जोरदार प्रतिसाद दिला.

मागील 10 वर्षात मतदारसंघात जवळपास एक लाखापेक्षा अधिक मतदारांची भर पडली आहे. या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात नागरिकांना मूलभूत सुविधा निर्माण करून देण्यावर मी भर देणार आहे. या मूलभूत सुविधा मिळाल्या तरच खऱ्या अर्थाने मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होण्यास वेळ लागणार नाही असा विश्वास यावेळी नागरिकांशी सवांद साधताना व्यक्त केला.

सर्वपक्षीय मान्यवरांसह वसाहतीतील मतदार बंधू भगिनींची भेट घेऊन, पुन्हा एकदा हिंगोलीच्या विकासाला चालना देण्यासाठी माझे हात बळकट करावे असे आवाहन केले.

यावेळी युवा कार्यकर्ते, महिला भगिनी, जेष्ठ नागरिक, मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments