Friday, December 6, 2024
Homeताज्या-बातम्याहिंगोली विधानसभा मधील सवड येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार तानाजीराव मुटकुळे यांनी...

हिंगोली विधानसभा मधील सवड येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार तानाजीराव मुटकुळे यांनी प्रचार सभा घेऊन आपली भूमिका मांडली

विधानसभा निवडणूक प्रचार निमिताने हिंगोली विधानसभा मधील सवड येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार तानाजीराव मुटकुळे यांनी प्रचार सभा घेऊन आपली भूमिका मांडली… गेल्या दहा वर्षात आपल्या भाजपा सरकारच्या माध्यमातून या गावांच्या विकासासाठी भरपूर विकास निधी उपलब्ध करून दिला आहे.

गावाला जोडणारे रस्ते, अंतर्गत रस्ते, सभा मंडप, पाणी पुरवठा योजनेची कामे सुरु आहेत.’माझ्या गावचा विकास झाला, ही भावना प्रत्येक ग्रामस्थाच्या बोलण्यातून व्यक्त होत आहे. गावच्या विकासाविषयी जागरूक असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मागील 10 वर्षात जी कामे झालीत याचा अभिमान वाटतोय. आपल्या सर्वांच्या एकजुटीमुळे आणि मेहनतीमुळे गावचा चेहरामोहरा बदलत आहे. विकासासाठी ठाम भूमिका घेणाऱ्या भाजपा प्रतिनिधी खऱ्या अर्थाने विकास घडवू शकतो. त्यामुळे येत्या २० तारखेला कमळ चिन्हासमोरील बटन दाबून भरभरून आशीर्वाद द्यावेत, असे मतदार बंधू- भगिनींना आवाहन केले.या वेळी उपस्थित महायुतीचे सर्व पदाधिकारी, समाजबांधव,गावकरी मंडळी आदींची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments